यशला पाहताच आईच्या अश्रूंचा बांध फुटला...

By admin | Published: February 15, 2017 04:31 AM2017-02-15T04:31:45+5:302017-02-15T04:31:45+5:30

शहरातील इंदिरानगरमधून बेपत्ता झालेला अडीच वर्षांचा यश वर्मा सुखरूप असल्याचे प्रत्यक्ष पाहताच त्याच्या आईला अश्रू अनावर झाले.

Seeing the achievement of Mother's tears damaged ... | यशला पाहताच आईच्या अश्रूंचा बांध फुटला...

यशला पाहताच आईच्या अश्रूंचा बांध फुटला...

Next

टिटवाळा : शहरातील इंदिरानगरमधून बेपत्ता झालेला अडीच वर्षांचा यश वर्मा सुखरूप असल्याचे प्रत्यक्ष पाहताच त्याच्या आईला अश्रू अनावर झाले. यश लातूरला सापडला असून तो तेथील ‘कलापंढरी चाइल्डलाइन’ या संस्थेच्या ताब्यात असल्याचे त्याच्या पालकांना समजले होते. मात्र, त्याची भेट होईपर्यंत त्याच्या पालकांना काही सुचत नव्हते. पण, नशीब बलवत्तर म्हणून यश सुखरूप मिळाल्याची भावना त्याच्या पालकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
टिटवाळा पोलीस उपनिरीक्षक गणपत पोळ, त्यांचे पथक आणि यशचे आईवडील शनिवारी पहाटे २ च्या सुमारास लातूरहून टिटवाळ्यात पोहोचले. त्यानंतर, सकाळी अधिकृतपणे कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर यशला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. त्या वेळी त्याच्या पालकांनी ‘लोकमत’कडे वरील भावना व्यक्त केली.
टिटवाळ्यातील इंदिरानगरमधून सोमवार, ६ फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास यश बेपत्ता झाला होता. यश कुठेही दिसत नसल्याने त्यांनी सगळीकडे त्याचा शोध घेतला. पण, तो कुठेच न सापडल्याने त्यांनी टिटवाळा पोलिसांत धाव घेतली. सुरुवातीला पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून घेतली. पण, त्याच्या पालकांनी शिवसैनिक किशोर शुक्ला यांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला. त्याचदरम्यान तेथील एका चायनीजवाल्याने यशला एक अनोळखी व्यक्ती रेल्वे स्थानकाकडे घेऊन गेल्याचे सांगितले. त्याच आधारावर पोलिसांनी त्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदवला. मात्र, याचदरम्यान यशच्या वडिलांना यश हवा असेल तर २० लाख रुपये द्या, असा खंडणीचा फोन आला होता. त्यामुळे पोलीस सतर्क झाले होते.
सोशल मीडिया, रेल्वे तसेच सर्वच पोलीस ठाण्यांत यशचे फोटो, तपशील पाठवण्यात आले. यशचा फोटो पाहून लातूर पोलिसांनी ७ फेब्रुवारीला फोटो व्हायरल केलेल्या नंबरवर संपर्क साधला. त्यांनी यश आमच्याकडे असल्याचे कळवले. यश त्याचे स्वत:चे तसेच वडिलांचे नाव उमेश असल्याचे सांगत होता. ही जुजबी माहिती पडताळल्यानंतर लातूर पोलिसांनी त्याचा फोटो ई-मेल केला. हा फोटो पाहून टिटवाळा पोलीस व त्याचे पालक लातूरला रवाना झाले. त्याला तेथील पोलिसांनी ‘कलापंढरी चाइल्डलाइन’च्या ताब्यात ठेवले होते. तेथे त्याला पाहिल्यानंतर त्याच्या आईवडिलांना अश्रू आवरता आले नाहीत. सर्व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लातूर पोलिसांनी त्याला आईवडील व टिटवाळा पोलिसांच्या स्वाधीन केले. ते त्याला घेऊन शनिवारी शहरात आले. (वार्ताहर)

Web Title: Seeing the achievement of Mother's tears damaged ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.