आरटीईसाठी २६३७ विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 04:14 AM2018-06-13T04:14:44+5:302018-06-13T04:14:44+5:30
शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली खाजगी शाळांमधील २५ टक्के प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी जिल्हाभरातील दोन हजार ६३७ विद्यार्थ्यांची ज्युनिअर, सिनिअर केजीसह पहिलीच्या वर्गाच्या प्रवेशासाठी निवड सोमवारी करण्यात आली.
ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली खाजगी शाळांमधील २५ टक्के प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी जिल्हाभरातील दोन हजार ६३७ विद्यार्थ्यांची ज्युनिअर, सिनिअर केजीसह पहिलीच्या वर्गाच्या प्रवेशासाठी निवड सोमवारी करण्यात आली. या फेरीस विलंब झाल्यामुळे शाळांमध्ये पालकांनी आपापल्या पाल्यांचे २० जूनपर्यंत त्त्वरीत प्रवेश घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.
निवड झालेल्या पाल्यांच्या पालकांनी आॅनलाइन अॅडमिट कार्ड प्राप्त करावे आणि संबंधीत शाळेत मुदत संपण्यापूर्वी प्रवेश मिळवावा. आरटीईच्या या २५ टक्के प्रवेशासाठी जिल्ह्यातील ६४० शाळा निश्चित केलेल्या आहेत. यापैकी प्रवेश सोडतमध्ये प्राप्त होणाºया शाळेत प्रवेश घेणे अपेक्षित आहे. या २५ टक्क्यांमधील प्रवेशासाठी जिल्ह्यात १६ हजार ५४६ प्रवेश आरक्षित ठेवले आहेत. यामध्ये केजीच्या तीन हजार ४८० विद्यार्थ्यांना तर पहिलीच्या वर्गासाठी १३ हजार ६६ विद्यार्थ्यांचे प्रवेश आरटीईअंतर्गत आरक्षित ठेवलेले आहेत.