आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत २६४३ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:29 AM2019-06-18T00:29:36+5:302019-06-18T00:29:44+5:30

२७ जूनपर्यंत प्रवेश घ्या; पालकांना सूचना

The selection of 2643 students in the second list of RTE admissions | आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत २६४३ विद्यार्थ्यांची निवड

आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत २६४३ विद्यार्थ्यांची निवड

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील दुर्बल घटकातील मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे यासाठी आरटीईअंतर्गत शाळा प्रवेशासाठीची दुसरी शनिवारी आॅनलाइन यादी जाहीर केली आहे. या यादीत २ हजार ६४३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी १७ जून ते २७ जूनपर्यंत शाळा प्रवेश घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील कायम विना अनुदानित सर्व प्रकारच्या, सर्व माध्यमांच्या तसेच सर्व मंडळांशी संलग्न शाळांमध्ये (अल्पसंख्यांक शाखा वगळून) आरटीईअंतर्गत २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. २०१८- २०१९ या शैक्षणिकवर्षात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रवेश प्रक्रि या आॅनलाईन करण्याचे प्रस्तावित केले असून ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेदेखील २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका आणि पाच तालुक्यातील शाळांनी आॅनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून पटसंख्येची माहिती भरली होती. तसेच पालकांनीदेखील आॅनलाईन पद्धतीने आपल्या पाल्यांचे अर्ज दाखल केले होते.

मुदतीत अर्ज न केल्यास फेरविचार नाही
पहिल्या फेरीत ५ हजार ८९६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी केवळ ३ हजार ९६७ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले आहेत. आता १५ जून रोजी दुसरी यादी जाहीर झाली असून यामध्ये २ हजार ६४३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पहिलीच्या वर्गासाठी १ हजार ९८८ तर, प्रि-प्रायमरीसाठी ६५५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्यास त्याचा पुढील फेरीत विचार केला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पालकांनी हे करावे
अर्जदारांनी मोबाइलवर संदेश आला नसेल, त्यांनी स्वत:च्या लॉगिनमधील अ‍ॅडमिट कार्ड या आॅपशनमध्ये जाऊन ते प्राप्त करून घ्यावे. तसेच शाळेत प्रवेश घेण्यासाठी जातांना सर्व ओरीजनल कागदपत्रे सोबत घेवून जावे. शाळा प्रवेशासंबंधीत काही तक्र ारी असल्यास याच काळात संबंधीत तालुका व जिल्हा परिषद ठाणे येथे शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असे अवाहन शिक्षण विभगाने करण्यात आले आहे. दिलेल्या मुदतीनंतर तक्र ार घेवून आल्यास त्याचा विचार करण्यात येणार नसल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

Web Title: The selection of 2643 students in the second list of RTE admissions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.