पीएम श्री योजनेच्या साेयी-सुविधांसाठी ठाणे जिल्ह्यातील १४ शाळांची निवड

By सुरेश लोखंडे | Published: April 27, 2023 04:44 PM2023-04-27T16:44:32+5:302023-04-27T16:44:48+5:30

निवड झालेल्या शाळांच्या भौतिक प्रकारच्या सर्व सुधारणेची कामे हाती घेण्यात येणार

Selection of 14 schools in Thane district for PM Shri Yojana support-facilities | पीएम श्री योजनेच्या साेयी-सुविधांसाठी ठाणे जिल्ह्यातील १४ शाळांची निवड

पीएम श्री योजनेच्या साेयी-सुविधांसाठी ठाणे जिल्ह्यातील १४ शाळांची निवड

googlenewsNext

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ‘पीएम श्री’ योजना हाती घेण्यात आली आहे. योजनेतून शाळांच्या इमारत दुरुस्ती, नवीन वर्ग खोली, स्वच्छता गृह , संरक्षण भिंत, सौर ऊर्जा, सायन्स लॅब, संगणक लॅब आदी साेयी सुविधाी प्राप्त करून दिल्या जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील महापािलका नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या कार्या क्षेत्रातील तब्बल १४ शाळाची निवड प्रथम टप्प्यात झाली आहे.

निवड झालेल्या शाळांच्या भौतिक प्रकारच्या सर्व सुधारणेची कामे हाती घेण्यात येणार आहे. या सुविधांचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ५ शाळासह महानगरपालिकातील सहा शाळा, नगरपालिका क्षेत्रातील दाेन, शहापुर नगरपंचायतीमधील एका शाळेची निवड करण्यात आलेली आहे. या याेजनेसाठी निवड झालेल्या या शांळाच्या कामांसह नवीन वर्ग खोली बांधण्यात येईलत्र तर मुली, मुलं तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता गृहांची साेय केली जाईल. शाळेला संरक्षण भिंत, सौर ऊर्जा, सायन्स लॅब, संगणक लॅब इत्यादी सर्व भैतिक सुविधासाठी शाळेच्या गरजेनुसार उपलब्ध हाेईल. त्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येत आहे.

यासाठी जि.प. शाळा डोहळेपाडा ता. भिंवडी, कल्याणमधील माणिवली, मुरबाडमधील कोलठण शहापूरमधील शाळा नं.१, अंबरनाथची काकडवाल आदी जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश आहे. तर बदलापुरमधील कुळगाव, अंबरनाथ नपामधील अॲडन्स फॅक्ट्रीची शाळा, भिवंडी मनपामधील अवचित पाडा येथील उर्दू हायस्कूल, कल्याणच्या तिसगावची शाळा नं. १८, नवी मुंबई नमपामधील आंबेडकर नगर शाळा नं. ५५, उल्हासनगर मनपाची शाळा नं. १२, ठाणे मनपा शाळा नं. ६२, मिरा भाईंदर मनपा शाळा नं. २२ आदी शाळांना या साेयी सुविधा व लॅबचा लाभ या याेजनेतून हाेणार आहे.

Web Title: Selection of 14 schools in Thane district for PM Shri Yojana support-facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.