'चक्रीवादळ' आपत्तीवर मात करणाऱ्या सरावासाठी ठाण्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथची निवड

By सुरेश लोखंडे | Published: November 2, 2023 05:32 PM2023-11-02T17:32:04+5:302023-11-02T17:33:27+5:30

राज्यस्तरीय रंगीत तालीमसाठी ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मोठागाव-ठाकुर्ली, अंबरनाथ एमआयडीसी व भिवंडी तालुक्यातील पडघा गाव आदींची निवड करण्यात आली आहे.

Selection of Bhiwandi, Kalyan, Ambernath in Thane for 'Cyclone' Disaster Overcoming Exercise | 'चक्रीवादळ' आपत्तीवर मात करणाऱ्या सरावासाठी ठाण्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथची निवड

'चक्रीवादळ' आपत्तीवर मात करणाऱ्या सरावासाठी ठाण्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथची निवड

ठाणे : चक्रीवादळ आपत्तीवर मात करून ही आपत्ती निवारण्यासाठी कोकण किनार पट्टीमधील जिल्ह्यांमध्ये रंगीत तालीम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आली आहे. या राज्यस्तरीय रंगीत तालीमसाठी ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मोठागाव-ठाकुर्ली, अंबरनाथ एमआयडीसी व भिवंडी तालुक्यातील पडघा गाव आदींची निवड करण्यात आली आहे. ९ नाेव्हेंबरराेजी या सरावाची रंगीत तालीम पार पडणार आहे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी सांगितले.

संभाव्य चक्रीवादळ आपत्ती निवारणविषयी होणाऱ्या रंगीत तालिमीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेऊन सविस्तर मार्गदर्शन संबंधीत अधिकाऱ्यांना केले. या बैठकीला परदेशी यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अनिता जवंजाळ, तहसिलदार संजय भोसले, अंबरनाथच्या तहसिलदार प्रशांती माने आदींसह जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपालिकांचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अग्निशमन अधिकारी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या प्रकारे मदत कार्य करता येईल, आपदग्रस्तांना वाचविण्यासाठी काय तयारी केली जाणार आहे, आपदग्रस्तांची कशा प्रकारे सुटका करणार आहे, आपत्तीच्या अनुषंगाने करण्यात येणारे उपाय योजना, साधनसामुग्री उपलब्धता, मनुष्यबळ, किनाऱ्यावरील नागरिकांचे स्थलांतरण, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, निवारा केंद्रे, फूड पॅकेट आदींच्या तयारीची रंगीत तालीम या निवडलेल्या गांवामध्ये पार पडणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील तीन तालुक्यातील तीन गावांमध्ये ही रंगीत तालीम होणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सर्वच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. केंद्रीय स्तरावरून या रंगीत तालीमचे बारकाईने निरीक्षण करण्यात येणार असून सर्व यंत्रणांनी यात गांभीर्याने सहभागी व्हावे, अशा सूचना परदेशी यांनी यावेळी दिल्या.

Web Title: Selection of Bhiwandi, Kalyan, Ambernath in Thane for 'Cyclone' Disaster Overcoming Exercise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.