कंत्राटी भरतीसाठी नऊ एजन्सींची निवड; राज्य शासनाच्या अध्यादेशाला सरकारी कर्मचार्यांसह कामगारांचा विरोध !
By सुरेश लोखंडे | Published: September 18, 2023 07:45 PM2023-09-18T19:45:30+5:302023-09-18T19:46:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खणी कर्म विभागाने ६ सप्टेंबर रोजी नऊ खाजगी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खणी कर्म विभागाने ६ सप्टेंबर रोजी नऊ खाजगी एजन्सी मार्फत नोकर भरती करण्याचा शासन अध्यादेश जारी केलेला आहे. त्यास ठाणे जिल्ह्याच्या कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली सरकारी कर्मचार्यांनी आज तीव्र विरोध करीत निदर्शने केली. यास अनुसरून या कर्मचार्यांच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी सुदान परदेशी यांना निवेदन दिले, असे यांनी संघटनांच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निवेदन मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना पाठवण्याचे आश्वासन दिले.
कंत्राटी पध्दतीने कर्मचार्यांची निवड करण्यासाठी नऊ एजन्सींची निवड केल्याचा राज्य शासनाचा अध्यादेश जारी झालेला आहे. या अध्यादेशासह शासन निर्णयाविराेधात कामगार संघटना संयुक्त कृती समिती आज राज्यभर निदर्शने करून या अध्यादेशाला विराेध केला. त्यास अनुसरून ठाणे जिल्हाधिकारी कायार्लयातील कर्मचार्यांनीही निदर्शने करून विराेध दर्शवला आहे.
या धरणे आंदाेलनात जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, विविध महामंडळे या कार्यालयात कार्यरत संघटना,आयटक,इंटक,एच.एम.एस.सिआयटियू, भारतीय कामगार सेना,रेल्वे,इन्शुरन्स,बँक,डिफेन्स, एमआयडीसी, वीज कंपन्या कार्यरत कामगार संघटनांचे पदाधिकारी उपिस्थत हाेते असे यावेळी कामगार नेते कॉम्रेड भास्कर गव्हाळे, उदय चौधरी,कृष्णा भोयर,जे.आर.पाटीलआदी सहभागी हाेते.