सेल्फीने खच्चून भरलं फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 01:18 AM2019-04-30T01:18:53+5:302019-04-30T06:30:14+5:30

सेल्फी विथ व्होटचे फोटो शेअर करण्याबाबत तरुणाईइतकाच उत्साह पाहायला मिळाला, तो ज्येष्ठांचा. आम्ही मतदान केले, तुमचे काय, अशी जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या प्रश्नासह अनेकांनी आपले सोशल मिडीयामध्ये शेअर केले.

Selfie fills up Facebook, Whatsapp | सेल्फीने खच्चून भरलं फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप

सेल्फीने खच्चून भरलं फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप

Next

स्नेहा पावसकर 

ठाणे : अगदी लहानसहान गोष्ट व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या तरुणाईने सोमवारी मतदान केल्यावर आपले फोटो शेअर केले नसते, तर नवल वाटले असते. पण, सेल्फी विथ व्होटचे फोटो शेअर करण्याबाबत तरुणाईइतकाच उत्साह पाहायला मिळाला, तो ज्येष्ठांचा. आम्ही मतदान केले, तुमचे काय, अशी जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या प्रश्नासह अनेकांनी आपले फोटो फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर सकाळपासून शेअर करायला सुरुवात केली आणि सोशल मीडिया दिवसभरात व्होटरमय होऊन गेला. 

लोकशाहीचं सगळ्यात मोठं कर्तव्य अर्थात मतदान. जास्तीतजास्त लोकांनी मतदान करावे आणि त्यातही देशाचे भविष्य असलेल्या तरुणाईने जबाबदारीने मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जागृती केली गेली. सोमवारी झालेल्या मतदानात तरुणाईचा उत्साह पाहायला मिळाला. मतदान केल्यावर अनेकांनी सकाळपासूनचा आपला मतदानाची खूण असलेल्या बोटासोबतचा सेल्फी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करून आपण हक्क बजावल्याचे दाखवले. यात मध्यमवयीन आणि ज्येष्ठही मागे नव्हते. अनेकांनी मतदान केल्यानंतर आपले स्वत:चे तसेच सहकुटुंबाचे फोटो पोस्ट केले आणि इतरांनाही मतदानाचे आवाहन केले. ठाण्यातील रवी जाधव, विजू माने, सुनील गोडसे, अशोक नारकर, नयन जाधव आदी कलावंतांनीही आपले सेल्फी विथ व्होटचे फोटो फेसबुकवर शेअर करून लोकशाहीचा उत्सव..., आम्ही केलं तुम्हीही करा..., ठाणेकर व्होट कर... अशा प्रकारच्या कॅप्शनसह सामान्य नागरिकांना मतदानासाठी आवाहन केलेले दिसले. अनेक नवमतदारांनीही फर्स्ट व्होट... म्हणत आपले फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे सोमवारी सोशल मीडियावरही लोकशाहीच्या उत्सवाचाच फिव्हर व चर्चा होती.

Web Title: Selfie fills up Facebook, Whatsapp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.