पदवीधर निवडणुकीत मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसह सेल्फी!
By पंकज पाटील | Updated: June 26, 2024 18:32 IST2024-06-26T18:32:14+5:302024-06-26T18:32:59+5:30
हा सेल्फी सध्या शहरात व्हायरल झाला असून याप्रकरणी सुजाता भोईर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

पदवीधर निवडणुकीत मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसह सेल्फी!
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये भाजपाच्या महिला शहराध्यक्षा सुजाता भोईर यांनी कोकण पदवीधर निवडणुकीत मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसह सेल्फी घेऊन फेसबुक आणि व्हॉटसअप स्टेटसला ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सेल्फी सध्या शहरात व्हायरल झाला असून याप्रकरणी सुजाता भोईर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
निवडणुकीत बॅलेट बॉक्सच्या आत मोबाईल वापरण्यास किंवा फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई असून आजवर असे प्रकार समोर आल्यानंतर त्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. मात्र असे असतानाही भाजपाच्या अंबरनाथ महिला शहर अध्यक्षा सुजाता भोईर यांनी मतदान केंद्रात मोबाईल नेऊन मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसोबत सेल्फी काढला आणि हा सेल्फी व्हॉटसअपच्या स्टेटसला ठेवला, तसंच फेसबुकवरही टाकला.