भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल पाठवण्याचे ठाणे जि. प.सीईओंचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 06:01 PM2020-10-03T18:01:21+5:302020-10-03T18:01:45+5:30
सातपुते यांनी प्रत्येक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करून नुकसान झालेल्या शेतीचा अहवाल तातडीने ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व शासनाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अंकुश माने, यांना दिले आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांनी गटशेती करावी, असे मार्गदर्शन ही त्यांनी केले आहे.
ठाणे - जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागाच्या शहापूर तालुक्यातील बहुतांशी शेतकर्यांच्या भात पिकांचे करपा व कडाकरपा या रोगाने नुकसान झाले आहे. त्याची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेच्या (जि.प.) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ ) रुपाली सातपुते, यांनी कुंडनपाडा, उंबरमाळी, अजनुप गावातील शिवारात जाऊन या भात शेतीच्या नुकसानीची पाहाणी केली. या नुकसान चा तत्काळ पंचनामे करुन तो अहवाल पाठवण्याचे आदेश ही त्यांनी कृषी खात्यास दिले आहे.
यंदा या दुर्गम भागातील भात शेतीचे करपा व कडाकरपा रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची दखल घेत सातपुते यांनी प्रत्येक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करून नुकसान झालेल्या शेतीचा अहवाल तातडीने ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व शासनाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अंकुश माने, यांना दिले आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांनी गटशेती करावी, असे मार्गदर्शन ही त्यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी कृषि तज्ज्ञांची समिती गठीत करून या समितीची टीम प्रत्येक्ष घटनास्थळी येऊन नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी केली. यामध्ये आठ ते दहा शेतकऱ्यांचे अंदाजे ३.१५ हेक्टर क्षेत्रावर किडरोग झाल्याचे आढळून आले. यावेळी समितीने कीड का लागली याचा अहवाल देत उपायोजना सुचविल्या आहेत. याशिवाय या रोगाची गाभीर्याने दखल घेत या समितीही काही दिवस आधी या गावांना भेटी देऊन रोखाचे कारण शोधल्याचा विषय या सीईओंच्या चर्चे दरम्यान उघड झाला आहे. शेतात पाणी साठल्या मुळे व सतत पडणाऱ्या पावसामुळे करपा व कडाकरपा रोगाचा या भात शेतीवर प्रादुर्भाव झाल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. या पाहाणी दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्य देवराम भगत, पंचायत समिती सदस्य राजेश कांबळे, उपसरपंच सचिन निचिते, कृषि विकास अधिकारी श्रीधर काळे, गट विकास अधिकारी सुशांत पाटील, कृषि अधिकारी विलास घुले आदी अधिकारी आणि गावकरी उपस्थित होते.
साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने रोग
शेतकऱ्यांनी जयश्रीराम, जोरदार, रुपम, दप्तरी -१००८ , शबरी, वायएसआर व स्थानिक सुधारीत वाणाच्या भाताची लागवड केल्याचे निदर्शनात आले. त्यावर औषधी फवारणी केली. परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे रोगाची तीव्रता कमी न झाल्याचे शेतकऱ्यांनी उघड केले आहे.