ठाणे जिल्हा रब्बी हंगामासाठी पाेषक; हरभरा, वाल, चवळीच्या उत्पादनाची लगबग!
By सुरेश लोखंडे | Published: October 31, 2023 06:11 PM2023-10-31T18:11:52+5:302023-10-31T18:11:56+5:30
हवेतील गारवा सकाळच्या वेळी वाढला आहे. त्यावर रब्बी हंगाम घेण्यासाठी बळीराजा सरसावला, असे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी लाेकमतला सांगितले
ठाणे : राज्याच्या अन्य जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाकडे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे बहुतांशी जिल्ह्यांमध्ये दुष्कळी स्थिती दिसून येत आहे. या तुलनेत ठाणे जिल्ह्यात १०९.७ टक्के म्हणजे २६७०.१ िममी उत्तम पाउस पडला आहे. त्यामुळे सध्या गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. हवेतील वाढता गारवा लक्षात घेउन जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रब्बी पिकाच्या लागवडीसाठी लगबग सुरू झाली आहे. सर्वा धिक रब्बी हरभऱ्याच्या पिकासह वाल, चवळी, मुग आदी रब्बी पिके पाच हजार ७५० हेक्टरवर घेण्यासाठी शेतीची तयारह पूर्ण झाली आहे.
अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यात भात हे एकमेव खरीपाचे पीक आहे. यानंतर मात्र रब्बीच्या पिकासाठी शेतकरी पूर्ण तयारीनिशी शेताच्या बांधावर दिसून येताे. त्यामध्ये हवेतील गारव्यावर येणाऱ्या हरभरा, वाल, मुग, चवळी, उडीद आदी कडधान्याच्या उत्पादनासाठी आता तत्पर झाला आहे. त्यासाठी पाच हजार ७५० हेक्टरवर या कडधान्याची लागवड हाती घेतली आहे. जिल्ह्यातील नदी, नाले सध्या वाहत आहे. धरणांमध्ये १०० टक्के पाणी झालेला आहे. पहाटेच्या वेळी जिल्ह्यातील माळरानावर, घाट परिसरात धुक्याचे सम्राज्य दिसून येत आहे. रब्बी पिकासाठी उत्तम हवामना असल्यामुळे गेल्या वषार्च्या तुलनेत यंदा तब्बल पाच हजार ७५० हेक्टरवर रब्बी हंगाम घेतला जात आहे. गेल्या वर्षी अवघ्या पाच हजार १०५ हेक्टरवर हा हंगाम घेतला हाेता.
त्यामुळे हवेतील गारवा सकाळच्या वेळी वाढला आहे. त्यावर रब्बी हंगाम घेण्यासाठी बळीराजा सरसावला, असे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी लाेकमतला सांगितले. या रब्बी हंगामात हरभरा माेठ्याप्रमाणात घेतला जात आहे. हेक्टरी ६७४ क्विंटल हरभऱ्याची उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. त्यास अनुसरून तीन हजार ४३२ हेक्टरवर शेतकऱ्यांकडून हरभरा पेरण्यात आलेला आहे. या पाठाेपाठ वालाच्या उत्पादनाकडे त्यांचे अधिक लक्ष असल्यामुळे यंदा तब्बल एक हजार १२ हेक्टरवर वाल लावून त्यांचे हेक्टरी ६०५ क्विंटल उत्पादकता घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. चवळीचे पीक ७१५ हेक्टरवर घेतले जात आहे. त्याची उत्पादकता हेक्टरी ६४९ क्विंटल निश्चित केली आहे. मुग यंदा २२० हेक्टरवर घेतला जात आहे. ६८२ क्विंटल उत्पादकता नश्चित झाली आहे. उडीद २०१ हेक्टरवर घेतला जात असून ३१९ क्विंटल उत्पादकता सध्याच्या हवामनाला अनुसरून निश्चत केली आहे. रब्बी मका या पिकाचे उत्पादन ११३ हेक्टरवर घेतले जात असून तीळ ५७ हेक्टर क्षेत्रावर घेण्याचे नियाेजन शेतकऱ्यांनी करून त्याप्रमाणे कामाला प्रारंभही करण्यात आलेला आहे.