ठाणे  जि.प.च्या शिक्षण खात्यातील वरिष्ठ सहाय्यक १५ हजारांची लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 09:29 PM2019-12-30T21:29:31+5:302019-12-30T21:32:50+5:30

शाळेचे बांधकाम करूनही त्यांचे बील काढण्यास टाळाटाळ केली जात होती. बील प्राप्त करून घेण्यासाठी साळवे यांच्याकडे तक्रारदारांनी सतत फेºया मारल्या. नऊ लाख ५८ हजार रूपयांचे हे बील मंजूर करण्यासाठी संबंधीत फाईल पुढे पाठवण्यासाठी साळवे यांनी १५ हजार रूपयांची लाच तक्रारदारास मागितली होती.

Senior Assistant in Education department of Thane zp arrested for taking bribe of Rs | ठाणे  जि.प.च्या शिक्षण खात्यातील वरिष्ठ सहाय्यक १५ हजारांची लाच घेताना अटक

रोख १५ हजारांची लाच घेताना साळवे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून अटक केली

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेत गेल्या तीन महिन्यातील ही तिसरी घटना घडलीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा हा ट्रॅप शुक्रवारीच यशस्वी होणार होतासाडे नऊ लाखांच्या बिलाची फाईल साळवे यांनी पुढे पाठवण्यास टाळाटाळ केली


ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक दिपक चिंतामण साळवे (४८) यास १५ हजारांची लाच घेताना येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुपारी दीड वाजता रंगे हात पकडले. जिल्हा परिषदेत गेल्या तीन महिन्यातील ही तिसरी घटना घडली आहे.
शाळेचे बांधकाम करूनही त्यांचे बील काढण्यास टाळाटाळ केली जात होती. बील प्राप्त करून घेण्यासाठी साळवे यांच्याकडे तक्रारदारांनी सतत फेºया मारल्या. नऊ लाख ५८ हजार रूपयांचे हे बील मंजूर करण्यासाठी संबंधीत फाईल पुढे पाठवण्यासाठी साळवे यांनी १५ हजार रूपयांची लाच तक्रारदारास मागितली होती. शुक्रवारी ही रक्कम देण्याचे ठरले. पण तक्रारदाराकडे त्या दिवशी रक्कम नसल्यामुळे तो देऊ शकला नाही. तरी देखील साळवे यांनी फाईल मंजुरीसाठी पुढे पाठवली नाही. सोमवारी दुपारी रोख १५ हजारांची लाच घेताना साळवे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा हा ट्रॅप शुक्रवारीच यशस्वी होणार होता. पण दोन दिवसांच्य फुरसतीनंतर ही साळवे अखेर पोलिसांच्या या जाळ्यात अडकलेच.
शाळेचे बांधकाम पूर्ण होऊनही साडे नऊ लाखांच्या बिलाची फाईल साळवे यांनी पुढे पाठवण्यास टाळाटाळ केली. खूप प्रयत्न करूनही फाईल मंजुरीसाठी न पाठवल्यामुळे बांधकाम केलेल्या कंपनीच्या २२ वर्षीय ठेकेदाराने २७ डिसेंबर रोजी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. याची पडताळी करून आज पथक प्रमुख पोलिस निरिक्षक संतोष शेवाळ, योगेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घोलप, शेख, जाधव आणि देसाई यांनी साफळ यशस्वी करून सावळे यांना रंगे हात पकडले. प्राथमिक विभागातील या घटनेसह माध्यमिक विभागातील माळी व पवार या दोघानाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडून आधीच कारवाई केली आहे.

Web Title: Senior Assistant in Education department of Thane zp arrested for taking bribe of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.