ज्येष्ठ सिने पत्रकार, लेखिका ललिता ताम्हणे कालवश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 12:43 PM2020-05-30T12:43:16+5:302020-05-30T12:43:44+5:30

ज्येष्ठ सिने पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचं दीर्घ आजारांमुळे वयाच्या ६०व्या वर्षी ठाण्यात दुःखद निधन झाले.

Senior Cine journalist, writer Lalita Tamhane passed away | ज्येष्ठ सिने पत्रकार, लेखिका ललिता ताम्हणे कालवश

ज्येष्ठ सिने पत्रकार, लेखिका ललिता ताम्हणे कालवश

googlenewsNext

ठाणे - ज्येष्ठ सिने पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचं दीर्घ आजारांमुळे वयाच्या ६०व्या वर्षी ठाण्यात दुःखद निधन झाले. लोकसत्ताच्या लोकमुद्रा पुरवणीचे त्यांनी संपादन केले होते. मृदू,लाघवी स्वभावाच्या ललिता बाईंनी सिनेपत्रकारितेला गॉसिप पासून दूर ठेवून वास्तवआणि सत्याचा पुरस्कार त्यांनी आपल्या बातम्यांत केला. त्यांचे अनेक अभिनेत्रींबरोबर मैत्री आणि स्नेहाचे संबंध होते.नूतन,स्मिता पाटील,माधुरी दिक्षित,रेणुका शहाणे, रेखा, दीप्ती नवल,मृणाल कुलकर्णी, प्रिया तेंडुलकर, प्रतीक्षा लोणकर आदींचा उल्लेख करावाच लागेल.त्यांनी स्मिता, स्मित, मी:स्मिता पाटील, नूतन, "तें'चीप्रिया प्रिया तेंडुलकर ही पुस्तकें रसिकांना आवडली होती.आणि अनेक आवृत्या निघाल्या आहेत. त्यांनी उजळल्या दाही दिशा,झाले मोकळे आकाश या दोन कादंबऱ्या लिहिल्या होत्या. सध्या त्या दीप्ती नवल चं चरित्र लिहीत होत्या. त्यांच्या मागे विधीज्ञ विनीत रणदिवे आणि मुलगी सोनल आणि तीन बहिणी हा परिवार आहे.

Web Title: Senior Cine journalist, writer Lalita Tamhane passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.