तब्बल तीन तास ज्येष्ठ नागरिक लिफ्टमध्ये अडकून; ठाणे रेल्वे स्थानकातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 01:05 PM2019-10-28T13:05:44+5:302019-10-28T13:08:02+5:30

प्रवाशाचा रक्तदाब वाढला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

senior citizen got stuck in the lift For three hours in Thane railway station | तब्बल तीन तास ज्येष्ठ नागरिक लिफ्टमध्ये अडकून; ठाणे रेल्वे स्थानकातील घटना

तब्बल तीन तास ज्येष्ठ नागरिक लिफ्टमध्ये अडकून; ठाणे रेल्वे स्थानकातील घटना

googlenewsNext

- पंकज रोडेकर

ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकातील लिफ्ट बंद पडल्याने 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक अडकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली असून लिफ्टमध्ये अडकलेल्या आनंद चैले (65) यांना बाहेर काढण्यासाठी तब्बल तीन तास लागले. बंद पडलेल्या लिफ्टमध्ये चैले एकटे होते. जर ही घटना गर्दीच्या वेळेस घडली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. त्याबरोबर या घटनेने रेल्वे स्थानकात बसवलेल्या लिफ्टबाबत संशय व्यक्त होऊ लागला. 

कळवा, विटावा येथील रहिवासी आनंद चैले (65) हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात सकाळीच आले होते. ते रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 3-4 वरुन फलाट 5 क्रमांकावर येणारी जलद लोकल पकडण्यासाठी लिफ्टने जात होते. गर्दी नसल्याने ते लिफ्टमध्ये एकटेच होते. लिफ्ट सुरु झाल्यावर अचानक लिफ्ट मध्येच बंद पडली. लिफ्ट बंद पडल्याचे समजताच रेल्वे प्रशासनाची धावाधाव झाली. प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी लिफ्ट खाली-वर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही.

यानंतर अर्धा तासाने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र त्यांनाही लिफ्ट हलवता आली नाही. अखेर तीन तासांनंतर लिफ्ट थोडी वर आल्यावर चैले यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तीन तास एकटेच लिफ्टमध्ये अडकलेल्या चैले यांचा रक्तदाब वाढला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती व्यवस्थित आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे रेल्वे स्थानकात लिफ्ट बंद पडल्यानमुळे प्रवासी अडकल्याची ही पहिली घटना आहे. लिफ्ट नेमकी कशामुळे बंद पडली, याबद्दल रेल्वे प्रशासनने माहिती दिलेली नाही. 
 

Web Title: senior citizen got stuck in the lift For three hours in Thane railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे