ज्येष्ठ नागरिकाला १२ लाखांस लुबाडले
By admin | Published: March 16, 2017 02:50 AM2017-03-16T02:50:54+5:302017-03-16T02:50:54+5:30
बदलापूरमधील एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला त्याचे निवृत्तीवेतन विविध पॉलिसींमध्ये गुंतवण्याचे आमिष दाखवून त्यांना १२ लाखांना लुबाडल्याची घटना घडली आहे
बदलापूर : बदलापूरमधील एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला त्याचे निवृत्तीवेतन विविध पॉलिसींमध्ये गुंतवण्याचे आमिष दाखवून त्यांना १२ लाखांना लुबाडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोटाबंदीनंतर आॅनलाइन आणि कार्डच्या माध्यमातून होणारे व्यवहार वाढले आहेत. मात्र, त्याच वेळी या तंत्रज्ञानाबाबत पुरेशी माहिती नसल्याने या काळात अनेकांची लूटही झाली. तसाच काहीसा प्रकार बदलापूरमध्येही समोर आला आहे. आयुध निर्माणी संस्थेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर निवृत्तीवेतन विविध कंपन्यांच्या पॉलिसींमध्ये गुंतवून त्याचा फायदा घेण्याच्या उद्देशाने ६३ वर्षीय राणोजीराव जाधव यांनी पाच बड्या कंपन्यांमध्ये आपले पैसे गुंतवले. जाधव यांनी १२ वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून पैसे गुंतवण्याची तयारी दर्शवली. यासाठी सर्वच आरोपींनी जाधव यांना फोनवरून संपर्ककेला आणि त्या माध्यमातून त्यांना गुंतवणुकीची माहिती दिली. तसेच वेगवेगळ्या खातेधारकांचे क्रमांक देऊन त्यांना त्यात आॅनलाइन आणि ड्राफ्टच्या माध्यमातून पैसे भरण्याचेही सांगण्यात आले. (प्रतिनिधी)