ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि शिक्षक पं. दिनकर पणशीकरांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 08:33 PM2020-11-02T20:33:10+5:302020-11-02T20:33:55+5:30

१९३६ मध्ये मुंबईत पंडित दिनकर पणशीकर यांचा जन्म झाला. गुजरातमधील पाटण येथे दत्तात्रय कुंटे यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.

Senior classical singer and teacher Pt. Dinkar Panashikar passes away | ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि शिक्षक पं. दिनकर पणशीकरांचे निधन

ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि शिक्षक पं. दिनकर पणशीकरांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्दे१९३६ मध्ये मुंबईत पंडित दिनकर पणशीकर यांचा जन्म झाला. गुजरातमधील पाटण येथे दत्तात्रय कुंटे यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.

अंबरनाथ :   जयपूर अत्रोली घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि शिक्षक पं. दिनकर पणशीकर यांचे अल्पशा आजाराने अंबरनाथ येथे  खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात शंतनू आणि भूपाल ही दोन मुले आहेत. शंतनू तबलावादक तर भूपाल सतारवादक आणि गायक म्हणून कार्यरत आहे.     त्यांच्यावर रात्री नऊ वाजता अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

१९३६ मध्ये मुंबईत पंडित दिनकर पणशीकर यांचा जन्म झाला. गुजरातमधील पाटण येथे दत्तात्रय कुंटे यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यानंतर मुंबईत येऊन त्यांनी पं. वसंतराव कुलकर्णी, पं. सुरेश हळदणकर आणि माणिकराव ठाकुरदास यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे रितसर शिक्षण घेतले. पुढे कलकत्ता येथे जाऊन पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडून त्यांनी प्रदिर्घकाळ गाणे आत्मसात केले. ‘कट्यार काळजात घुसली' नाटकात पं. वसंतराव देशपांडे यांच्यासमवेत भूमिका साकारण्याची संधी पं. दिनकर पणशीकरांना लाभली. आडाचौताल  या वैशिष्ट्यपूर्ण तालात त्यांनी विशेष संशोधन केले. या तालात त्यांनी २०० हून अधिक बंदिशी रचल्या. कोलकत्ता येथील आयटीसी संगीत संशोधक अकादमीतर्फे त्यांना संगीत क्षेत्रातील संशोधनासाठी

शिष्यवृत्ती मिळाली. गोवा कला अकादमीमध्ये संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. कर्नाटकमधील षडाक्षरी बुवांच्या नावाने दिला जाणारा मानाचा पुरस्कार, चतुरंग संगीत सन्मान आदी अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक विचारशील गायक कलावंत हरपल्याची भावना शास्त्रीय संगीत वर्तुळात व्यक्त होत आहे. प्रख्यात प्रभाकर पणशीकर, दाजी शास्त्री पणशीकर यांचे दिनकर पणशीकर हे बंधू होत. 

पंडित दिनकर पणशीकर यांचा फार मोठा शिष्य वर्ग आहे. अंबरनाथ संगीत सभेचे ते संस्थापक सदस्य होते.

Web Title: Senior classical singer and teacher Pt. Dinkar Panashikar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.