५ व्या माय ठाणे शॉर्टफिल्म फेस्टीवलमध्ये जेष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांना "चित्ररत्न"पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 04:13 PM2019-12-16T16:13:04+5:302019-12-16T16:17:16+5:30
५ व्या माय ठाणे शॉर्टफिल्म फेस्टीवलमध्ये जेष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांचा "चित्ररत्न"पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
ठाणे:५ व्या माय ठाणे शॉर्टफिल्म फेस्टीवल मध्ये, नाट्य, , चित्र, क्षेत्रांत भरीव कामगिरी करणारे प्रसिद्ध जेष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांचा "चित्ररत्न"पुरस्कार देवून गौरव ब्लू एंटरटेंटमेंट व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय आयोजित ५ व्या माय ठाणे शॉर्टफिल्म फेस्टीवलमध्ये पी सावळाराम सभागृहात रविवारी देण्यात आला.
महाराष्ट्रातील नाट्य, चित्र, क्षेत्रांत श्रेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गेल्या ३ वर्षांपासून "चित्ररत्न" पुरस्काराने सन्मान ठाणे शॉर्टफिल्म फेस्टीवल मध्ये केला जातो..या निमित्ताने सकाळी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेची आयोजन केले होते. जवळपास ३०० विद्यार्थ्यांना यामध्ये सहभाग घेतला या फेस्टीवलचा मुख्य कार्यक्रम म्हणजे बक्षिस वितरण व चित्ररत्न पुरस्काराचे वितरण यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ठामपा उपमहापौर पल्लवी पवन कदम,अभिनेत्री नम्रता सुंभेराव,उपस्थित होते. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.डी.मराठे, डॉ.प्रदीप ढवळ,ब्लू एंटरटेंटमेंटचे पार्टनर प्रा. एकनाथ सोपान पवळे,पार्टनर डॉ .गणेश घुगरे उपस्थित होते. या कार्यक्रमाला तरूण संगीतकार विशाल राणे,अभिनेता विकास थोरात ,डॉ उल्हास वाघ,इतिहास अभ्यासक सदाशिव टेटविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश प्रधान,सचिव कमलेश प्रधान,खजिनदार सतिश सेठ यांनी मोलाचे सहकार्य मिळाले. "तुमच्या सारख्या तरुण मुलांना कधी मार्गदर्शन हवे असेल तर मला कळवा मी आवश्य येईल. असे जयंत सावरकर यांनी या वेळी म्हटले. ब्लू एंटरटेंटमेंट व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय आयोजित ५ व्या माय ठाणे शॉर्टफिल्म फेस्टीवल प्रेमी ज्याची आतुरतेने वाट पहात असतात अशा शॉर्टफिल्म फेस्टीवल मध्ये यावर्षी भारत देशांमधून तब्बल १५० चित्रपट प्राप्त झाले होते. त्यांपैकी निवडक सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक मूल्यांवर प्रकाश टाकणारे ६६ चित्रपट पाहण्याची संधी शॉर्टफिल्म फेस्टीवल दरम्यान चित्रपट रसिकांना मिळाली. प्लिज फॉरगीव मी,आधा चॉदं तुम रखलो,लव्हाळ,सौ.कौमारिनी, या शॉर्टफिल्मने फेस्टीवलमध्ये आपली छाप पाडली चित्रपटांबरोबरच चित्रपट विषयक चर्चासत्रे, कार्यशाळा आणि प्रदर्शन यांचाही समावेश दरवर्षी प्रमाणे या वर्षीच्या शॉर्टफिल्म फेस्टीवल मध्ये होता.