"श्वासागणिक धोका...वेळीच ओळखा"; रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत ज्येष्ठ श्वसन विकारतज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांचे आवाहन

By जितेंद्र कालेकर | Published: January 14, 2024 05:35 PM2024-01-14T17:35:14+5:302024-01-14T17:35:22+5:30

कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प डॉ. मडके यांनी गुंफले.

senior respiratory disorder specialist Anil Madke Appeal | "श्वासागणिक धोका...वेळीच ओळखा"; रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत ज्येष्ठ श्वसन विकारतज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांचे आवाहन

"श्वासागणिक धोका...वेळीच ओळखा"; रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत ज्येष्ठ श्वसन विकारतज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांचे आवाहन

ठाणे: श्वसनासाठी रोज शुद्ध हवा मिळणे हा आपला अधिकार आहे, आपल्याला अन्न आणि पाणी दर्जेदार हवे असते. पण दर्जेदार हवेचा आग्रहच आपण धरत नाही. आज प्रत्येक श्वास प्रदुषित ठरतोय. तरी आपण अनभिज्ञ असून आपल्याला याची काळजी किंवा तमा नाही. तेव्हा, श्वासागणिक धोका...वेळीच ओळखा’, असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ श्वसन विकारतज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांनी केले.

ठाण्यातील सरस्वती शाळेच्या पटांगणात आयोजित कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प डॉ. मडके यांनी गुंफले. व्याख्यानाच्या प्रारंभी मान्यवरांना वृक्ष भेट देऊन डॉ. अनिल मडके यांनी पर्यावरणाचा संदेश दिला. तसेच अनेक जागतिक संदर्भ देत, अग्नीचा शोध लागल्यावर पहिल्या औद्योगिक क्रांतीनंतर आणि विविध नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे वायु प्रदुषणाचा परिणाम जाणवु लागल्याचे सोदाहरण स्पष्ट केले. यात निसर्ग अतिरेकी नाही तर माणुस अतिरिकी आहे. हवा प्रदुषणाला १० टक्के निसर्ग, तर ९० टक्के माणुस जबाबदार आहे. तेव्हा, वायु प्रदुषणाच्या धोक्यांवर आज जगभर चर्चा होत आहेत. मात्र आपण आजही दूर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले,  जगण्यात श्वसन एवढे महत्त्वाचे असताना आपण त्याबद्दल संवदेशनील, जागरुक नाही. आपली जीवनशैली, अगदी रोजचा स्वयंपाक, वाहन चालवणे, औद्योगिक क्षेत्रातील कामे, शेतात वापरली जाणारी किटकनाशके, डासांसाठी वापरले जाणारे मॉस्किटो रिपेलंट अशा अगणिक बाबींमुळे हवेचे प्रदूषण होत आहे. दुर्दैवाने हीच प्रदूषित हवा आपल्या अनारोग्यास मानसिक तणावास कारणीभूत ठरत आहे.  गेल्या चार दशकांमध्ये ग्लोबल वॉर्मिग वाढत आहे. २०२२ पर्यत कार्बन डायऑक्साइड वाढला आहे. भारताचे दरडोई कार्बन उत्सर्जन १.५ टन आहे. त्यामुळे वेदर (हवामान) नव्हे तर क्लायमेट (वातावरण) सुधारले पाहीजे. प्रदुषणात दिल्ली पाठोपाठ मुंबई असुन हवा प्रदुषणामुळे मानवाला अनेक आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. हवा प्रदूषणाचे हे संकट थेट आपल्या श्वासाशी संबंधित असल्याने वेळीच जागे होऊन निर्सगाला जपण्याचे आवाहनही  डॉ. मडके यांनी केले.   

याप्रसंगी व्यासपिठावर या सत्राचे अध्यक्ष डॉ. महेश जोशी, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, आ. निरंजन डावखरे आणि प्रा. किर्ती आगाशे उपस्थित होत्या. प्रास्तविकात डॉ.महेश जोशी यांनी, कोविड आल्यानंतरच सर्वाना श्वासाचे महत्व पटल्याचे सांगितले.

Web Title: senior respiratory disorder specialist Anil Madke Appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे