वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे ठाणे कोविड रुग्णालयात होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:24 AM2021-03-30T04:24:23+5:302021-03-30T04:24:23+5:30

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयाने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाची विशेष व्यवस्था सुरू केली आहे. आतापर्यंत ठाण्यातील ६ वृद्धाश्रमातील १०० ...

Seniors of old age home will be vaccinated at Thane Kovid Hospital | वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे ठाणे कोविड रुग्णालयात होणार लसीकरण

वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे ठाणे कोविड रुग्णालयात होणार लसीकरण

Next

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयाने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाची विशेष व्यवस्था सुरू केली आहे. आतापर्यंत ठाण्यातील ६ वृद्धाश्रमातील १०० हून अधिक वृद्धांनी नाेंदणी करून पहिला डोसही घेतला आहे. त्यामुळे आता वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना ठाणे कोविड रुग्णालय येथे विनाअडथळा लस मिळू शकणार आहे.

१ मार्चपासून गेल्या २०-२५ दिवसांच्या काळात ठाणे कोविड हॉस्पिटलने दहा हजारांपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. ठाणे महानगरपालिकेतर्फे ठाणे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. येथील उपचार पद्धती, अद्ययावत आयसीयू सुविधा, रुग्णांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि मनोरंजनासाठी होणाऱ्या विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांमुळे या हॉस्पिटलने ठाणेकरांच्या मनात वेगळे व सकारात्मक स्थान निर्माण केले. असाच एक उपक्रमाचा भाग म्हणून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाची सोय ठाणे कोविड हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे. ६ वृद्धाश्रमातील १०० हून जास्त वृद्धांनी आपली नाव नोंदणी करून डोसही घेतला आहे. वृद्धाश्रमातील बरेचसे वृद्ध हे विविध आजारांनी ग्रस्त असल्याकारणाने हॉस्पिटलतर्फे त्यांच्या आणण्या-सोडण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे.

सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण इथे चांगल्या पद्धतीने होत असून इथे आल्यावर पुढील २० मिनिटांमध्ये आमच्या ज्येष्ठांचं लसीकरण झालं. खूप कमी वेटिंग पिरेड, ५०० लोक बसतील एवढ्या खुर्च्या, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांसाठी व्हीलचेअर, लसीकरणाच्या ठिकाणी असलेला प्रेमळ स्टाफ व महत्त्वाचे म्हणजे पोस्ट व्हॅक्सिनेशन सेल्फी पॉईंट यामुळे हे सरकारी रुग्णालय आम्हाला आपलं दुसरं घर असल्यासारखंच वाटतं, असे आरंभ आजी केअरच्या संयोजक प्रियंका खोब्रागडे यांनी सांगितले आणि याचं श्रेय उपायुक्त विश्वनाथ केळकर यांना देता येईल, असेही त्या म्हणाल्या.

या लसीकरणाद्वारे आम्हाला जनतेची सेवा करायला मिळते आहे, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. वृद्धाश्रमामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत कुणी पोहोचणार नाही, याची कल्पना आल्याने आम्ही त्यांच्यासाठी या वृद्धाश्रमात जाऊन त्यांना इथपर्यंत घेऊन येण्यासाठी ॲम्ब्युलन्स आणि बसची सोय केली आहे. त्यांचं विनाअडथळा आणि काही त्रास न होता लसीकरण होईल याची व्यवस्था ठाणे कोविड हॉस्पिटलने केली आहे. त्यामुळे ठाण्यातील वृद्धाश्रमांनी आमच्याशी संपर्क करून तेथील वृद्धांचे ठाणे कोविड हॉस्पिटलमध्ये लसीकरण करून घ्यावे, असे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांनी सांगितले.

Web Title: Seniors of old age home will be vaccinated at Thane Kovid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.