संवेदनशील नागरिकांनी हरवलेल्या मुलांना आधार द्यावा : विवेक फणसळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:16 AM2021-02-21T05:16:26+5:302021-02-21T05:16:26+5:30

ठाणे : घरात लहान मुलांचा जन्म, त्यांचा वावर हा सर्वाधिक आनंदाचा क्षण असतो. मात्र, दुर्दैवाच्या फेऱ्यात अनेक मुले अडकतात. ...

Sensitive citizens should support lost children: Vivek Phansalkar | संवेदनशील नागरिकांनी हरवलेल्या मुलांना आधार द्यावा : विवेक फणसळकर

संवेदनशील नागरिकांनी हरवलेल्या मुलांना आधार द्यावा : विवेक फणसळकर

Next

ठाणे : घरात लहान मुलांचा जन्म, त्यांचा वावर हा सर्वाधिक आनंदाचा क्षण असतो. मात्र, दुर्दैवाच्या फेऱ्यात अनेक मुले अडकतात. त्यांना घर सोडावे लागते. काहींचे स्वतःचे घर हरवते. त्यांना संघर्ष करावा लागतो. जोपर्यंत आपल्या मुलात अर्थार्जनाची क्षमता तयार होत नाही, तोपर्यंत विघातक विचार करण्यापासून त्यांना परावृत्त करण्याची जबाबदारी पालकांची आहे. संवेदनशील नागरिकांनी हातभार लावून हरवलेल्या मुलांना आधार दिला पाहिजे, असे प्रतिपादन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी व्यक्त केले.

विजय जाधव लिखित आणि व्यास क्रिएशन्स प्रकाशित ‘हरवलेले मुक्कामपोस्ट’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला आ. संजय केळकर, समतोल फाउंडेशनचे विश्वस्त एस. हरिहरन उपस्थित होते. जाधव यांच्यासारखे अनेक विजय निर्माण झाले पाहिजेत, अशी अपेक्षा फणसळकर यांनी व्यक्त केली. आ. केळकर म्हणाले की, जाधव यांच्या कार्याचे समाधान शब्दांच्या पलीकडे आहे. त्यांच्या अनुभवाचे बोल म्हणजे अनुभूतीच आहे. जेव्हा आपण ‘हरवलेले मुक्कामपोस्ट’ वाचू तेव्हा आपल्याला हळूवार प्रसंग, प्रेरणादायी जीवन प्रवास, विचार करायला लावणाऱ्या घटना, आनंद देणारे किस्से असे सगळेच थक्क करणारे बघायला मिळेल. हे केवळ अनुभवकथन नसून, सामाजिक बांधिलकी प्रत्येकाने जपली पाहिजे, बालप्रेमी असले पाहिजे, असा संदेश देणारे हे पुस्तक आहे. हरिहरन आणि जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. धनश्री प्रधान-दामले यांनी निवेदन केले. डॉ. मनाली खरे यांनी पसायदान गायले.

---------------------

सामाजिक सुरक्षेची जबाबदारी पाेलिसांकडे

फणसळकर यांनी हरवलेली मुले आणि व्यक्ती यांना त्यांचे घर मिळवून देण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाने भर दिल्याचे सांगितले. २०१८ पासून ८८६ मुले, १८१४ मुली मिळून २७०० हरवलेल्या मुलांपैकी २४०० मुलांना घर मिळून दिले. १२ हजार ४५७ व्यक्ती हरवल्याची नोंद होती. त्यापैकी १० हजार ५७८ लोकांना घर शोधून दिले. समाज सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पोलीस बांधव घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

--------------

२० ठाणे ‘हरवलेले मुक्काम पाेस्ट’

Web Title: Sensitive citizens should support lost children: Vivek Phansalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.