पोलिसांनी वेषांतर करून शोधले सोनसाखळी चोर, दहा दिवस ठेवली पाळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 02:03 AM2017-11-26T02:03:43+5:302017-11-26T02:03:47+5:30

शहरातील विविध पोलीसठाण्याअंतर्गत दाखल सोनसाखळी चो-यांचा छडा लावून ठाणे पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने तब्बल १७ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून सात जणांना अटक केली आहे.

Sensitized thieves discovered by the police, and kept for ten days | पोलिसांनी वेषांतर करून शोधले सोनसाखळी चोर, दहा दिवस ठेवली पाळत

पोलिसांनी वेषांतर करून शोधले सोनसाखळी चोर, दहा दिवस ठेवली पाळत

Next

ठाणे : शहरातील विविध पोलीसठाण्याअंतर्गत दाखल सोनसाखळी चो-यांचा छडा लावून ठाणे पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने तब्बल १७ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून सात जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ८ लाख २७ हजारांचा किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक केलेल्या आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
कळवा, राबोडी, नौपाडा, शिळ डायघर या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व चेन चोरणा-या चार आरोपींना उपायुक्त डॉ. डी .एस . स्वामी व त्यांच्या सहका-यांनी पकडले. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे शहराच्या हद्दीत चेन स्नेचिंग करणारे मोक्काचे आरोपी हे अजमेर, राजस्थान येथे वास्तव्यास असल्याचे समजले.
त्यानुसार त्यांना पकडण्यासाठी दरोड विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक भंडारे ,पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांनी अजमेर येथे जाऊन वेषांतर करून त्यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरु वात केली. दहा दिवस सतत मागोवा घेतल्या नंतर तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी सरफराज फिरोज बेग उर्फसय्यद व त्याच्या चार साथीदारांना पकडण्यात त्यांना यश आले. त्यांना ताब्यात घेऊन ते ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कळवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ६, राबोडी १, नौपाडा १ असे एकूण ८ चेन स्नेचिंगचे गुन्हे केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून ४,३५,००० रु पयाचे २३९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
तसेच कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे यांनी आपल्या हद्दीतील पोलीस गस्त मोठ्या प्रमाणात वाढवली होती. अशीच गस्त घालत असतांना दुचाकीवरुन येऊन मंगळसूत्र खेचून पळणारा एक आरोपी रिझवान ईस्माईल शेख हा रंगेहाथ सापडल. या आरोपीने निजामपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक दुचाकी चोरली होती. त्या वरून तो व त्याचा साथीदार अली उर्फमामू साहिद हे कळवा येथील एका महिलेचे मंगळसूत्र खेचून पळत असताना पोलीस नाईक कोटकर व ढेबे यांनी पाठलाग करून त्यांना रंगेहाथ पकडले.
त्याच्याकडे कसून चौकशी
केली असता त्याने कळवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ४ ,नौपाडा ४ व शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १ असे नऊ गुन्हे केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून ३,९३,००० रु पये किंमतीचे १६८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.

अटक आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
अशा प्रकारे पोलिसांनी सगळ्या आरोपींकडून एकूण १७ गुन्हे उघडकीस आणून ८,२७,००० रूपयाचा माल हस्तगत केला. यातील तीन आरोपींवर यापूर्वी मोक्काअंतर्गत कारवाई केलेली आहे. तसेच हे चोर चोरीसाठी वाहनांचा वापर करीत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. अटक आरोपींनी २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

Web Title: Sensitized thieves discovered by the police, and kept for ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा