कोरोनाची लक्षणे असलेल्यांसाठी स्वतंत्र कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:34 AM2020-06-11T00:34:05+5:302020-06-11T00:34:42+5:30

‘लोकमत’चा दणका : प्रशासकांसोबत झाली बैठक, स्वतंत्र रुग्णवाहिकाही उपलब्ध होणार

Separate cell for corona symptoms | कोरोनाची लक्षणे असलेल्यांसाठी स्वतंत्र कक्ष

कोरोनाची लक्षणे असलेल्यांसाठी स्वतंत्र कक्ष

Next

अंबरनाथ : कोरोनाच्या संसर्गापेक्षा उपचार न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून यासंदर्भात बुधवारच्या ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सर्व राजकीय पक्ष एकवटले आहेत. त्यांनी शहरातील वैद्यकीय सुविधांची पोल-खोल करण्यासाठी बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन, या बैठकीचा अहवाल प्रशासक जगजितसिंग गिरासे यांना दिला आहे. या संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची तयारी गिरासे यांनी दाखवली आहे.

आठवडाभरात अंबरनाथमध्ये कोरोनाची लक्षणे असलेले, परंतु कोरोनाचा अहवाल न आलेले रुग्ण हे मृत्यूशी झुंज देत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने समोर आणले होते. तसेच उपचार न मिळाल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची बातमीही प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची दखल घेत शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावून वैद्यकीय सुविधांबाबत आढावा घेतला. उपचारादरम्यान रुग्णांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, याचा तपशील मांडणारा अहवाल तयार करण्यासाठीही बैठक झाली. दुपारी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि पालिकेचे प्रशासक उपजिल्हाधिकारी गिरासे यांची या मुद्यावर आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात वैद्यकीय सेवेसंदर्भात भेडसावणाºया समस्यांवर चर्चा केली. शहरात सेवा पुरवत असताना ज्या त्रुटी निर्माण झाल्या, त्या दूर करण्यासंदर्भात या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
शहरात डेंटल कॉलेजमध्ये कोरोना रुग्णालय सुरू झाल्यावर इतर रुग्णांनाही विनाविलंब उपचार मिळावेत, यासाठी स्थानिक डॉक्टरांना आदेश देण्याची मागणी करण्यात आली. तसेच कोरोनाची लक्षणे असलेले मात्र ज्यांचे अहवाल आले नाहीत, अशा रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याची मागणी प्रशासक गिरासे यांनी मान्य केली. रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचीही तयारी दर्शविली. अंबरनाथमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, या निर्णयामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

शहरातील वैद्यकीय सुविधा रुग्णांना वेळेवर उपलब्ध होत नसल्याने काही पदाधिकाºयांना घेऊन शहर हिताचे निर्णय घेण्यात आले. त्यांची अंमलबजावणी व्हावी, यासंदर्भात प्रशासक गिरासे यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. - अरविंद वाळेकर, शिवसेना शहरप्रमुख

Web Title: Separate cell for corona symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.