रोज चार तास सासरच्यांची सेवा करा - हायकोर्ट

By admin | Published: October 29, 2015 12:40 AM2015-10-29T00:40:08+5:302015-10-29T09:47:20+5:30

रोज रात्री चार तास सासरच्यांची सेवा करून त्यांच्या औषधोपचाराची काळजी घ्यायची. त्यानंतर एक तास दर्ग्यामध्ये जाऊन झाडलोट

Serve four hours a day - HiCort | रोज चार तास सासरच्यांची सेवा करा - हायकोर्ट

रोज चार तास सासरच्यांची सेवा करा - हायकोर्ट

Next

ठाणे : रोज रात्री चार तास सासरच्यांची सेवा करून त्यांच्या औषधोपचाराची काळजी घ्यायची. त्यानंतर एक तास दर्ग्यामध्ये जाऊन झाडलोट, तसेच झाडांना पाणी घालायचे. हे नित्यक्रमाने सलग चार महिने करायचे, अशी शिक्षा ठाणे न्यायालयाने रिझवान नुरीला दिली.
पत्नी शगुप्ताला मूल होत नाही, म्हणून त्याने तिचा छळ केला होता. त्यामुळे २०१० साली तिने स्वत:ला पेटवून घेतले होते. त्या प्रकरणी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. ती भोगून प्रायश्चित्त करेन, असे त्याने सांगितले. ठाणे न्यायालयातला असा निकाल पहिल्यांदाच लागला. २०१० पासून सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल मंगळवारी ठाणे सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश मृदुला भाटियांसमोर लागला. सरकारी वकील प्रकाश पुजारींनी ११ साक्षीदार तपासले. याप्रकरणी १४ दिवसांची सक्तमजुरी व ५० हजार दंड शिक्षाही सुनावली. दंडाची रक्कम शगुप्ताच्या वडिलांना द्यावी, असे आदेशही दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Serve four hours a day - HiCort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.