सफाई कामगारांसाठी समित्या स्थापन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:33 AM2019-06-12T00:33:36+5:302019-06-12T00:33:53+5:30

राजेश नार्वेकर यांनी दिली माहिती : कर्मचाऱ्यांसाठी समूह विमा योजना राबविणार

To set up committees for cleaning workers | सफाई कामगारांसाठी समित्या स्थापन करणार

सफाई कामगारांसाठी समित्या स्थापन करणार

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आयोगाकडे धाव घेत आहेत. ही बाब लक्षात घेवून व आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांच्या सुचनेनुसार जिल्हास्तरावर मॉनिटरींग व पालिका स्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील सफाई कर्मचाºयांवर होणाºया अन्याय व त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड हे मंगळवारी ठाण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यातील सफाई कर्मचारी व शासकीय अधिकारी यांच्यात समन्वय नसल्यामुळे सफाई कर्मचाºयांबाबतचे अनेक प्रश्न प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण होत असून त्यांच्यात असंतोषाचे वातावरण पसरत आहे. ही बाब लक्षात घेवून, हाथीबेड यांच्या सुचनेनुसार जिल्हास्तरावर मॉनिटरींग व पालिका स्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे.
या समित्यांच्या दर महा अथवा दर तीन महिन्यांनी बैठकांचे आयोजन करून आढावा घेतला जाणार असून सफाई कर्मचाºयांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे सफाई कर्मचाºयांना त्यांच्या छोट्याछोट्या समस्यांसाठी आयोगाकडे जाण्याची वेळ येणार नसल्याची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली. तसेच हाथीबेड यांनी केलेल्या सुचनेनुसार, सफाई कर्मचाºयांना त्यांच्या हक्काची, योजनांची, सुविधांची माहिती व्हावी यासाठी एका डाक्युमेंट्रीद्वारे त्यांच्यात जनजागृती करण्यात येणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

कायद्याच्या माहितीसाठी कार्यशाळा घेणार
अधिकारी व कर्मचाºयांना सफाई कर्मचाºयांचे कायदे व त्यांच्या अधिकारबाबात माहिती व्हावी, यासाठी अधिकारी आणि कर्मचाºयांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच सफाई कर्मचाºयांसाठी समूह विमा योजना राबविण्यासाठीदेखील प्रयत्न केले जाणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: To set up committees for cleaning workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे