शेतकऱ्यांचे भात खरेदीचे सात कोटी रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:17 AM2019-02-27T00:17:36+5:302019-02-27T00:17:39+5:30

४२ हजार क्विंंटल सरकारकडे जमा : २१ गोदामांमध्ये ठेवला साठवून

Seven crore paddy straw purchases of farmers | शेतकऱ्यांचे भात खरेदीचे सात कोटी रखडले

शेतकऱ्यांचे भात खरेदीचे सात कोटी रखडले

Next

शेणवा : केंद्र शासनाच्या आधारभूत भात खरेदी योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने ठाणे-रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून एक हजार सातशे पन्नास रूपये प्रति क्विंटल दराने नोव्हेंबर २०१८ ते २० फेब्रुवारी २०१९ या तीन महिन्यांत १७ कोटी २० लाख ७१ हजार ३७५ रुपयांचा ९८ हजार ३२६.५० क्विंटल भात खरेदी करून भाडेतत्त्वावर घेतलेल्या २१ गोदामांत ठेवला आहे.


शेतकऱ्यांना यातील ५६ हजार ४५४ क्विंटल भाताचे ९ कोटी ९८ लाख रुपये अदा करण्यात आले. २६ हजार सहाशे क्विंटल भाताच्या ५ कोटींची मागणी शासनाकडे केली आहे. तर १६ हजार १८५ क्विंटल भाताच्या २ कोटी ६३ लाख २३ हजार ७५० रु पयांची मागणी करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक विनय एडगे यांनी सांगितले. दरम्यान, शासनाकडे ४२ हजार क्विंटल भाताचे ७ कोटी रखडल्याने शेतकºयांत उदासीनता असून रखडलेली रक्कम लवकर मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.


आधारभूत भात खरेदी योजनेंतर्गत शासनाने यंदा भात खरेदीसाठी २६जानेवारी रोजी मान्यता दिल्यानुसार आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने शहापूर तालुक्यात १० कोटी ३२ लाख २७ हजार ७५ रुपयांचा ५८ हजार ९८६.९ क्विंटल भात खरेदी करून भातसानगर, पेंढरघोळ, सावरोली, नेवरे, खर्डी, अघई, बेडिसगांव, वेहळोली, चोंढे येथील बारा गोदामात ठेवला आहे. मुरबाड तालुक्यात ६ कोटी १५ लाख ७ हजार सातशे ७ रु पयांचा ३५ हजार एकशे ८६.९ क्विंटल भात खरेदी करून खापरी, माल, आगिवली येथील तीन गोदामात ठेवला आहे. कर्जत तालुक्यात ७२ लाख ६७ हजार ९२५ रुपयांचा ४ हजार १५२.७० क्विंटल भात गोदामात ठेवला आहे.
 

खरेदी भाताची रक्कम, मंजुरीसाठी शासनाला सादर करावे लागणारे दस्तऐवज बहुतांश शेतकरी वेळेवर सादर करीत नसल्याने मंजुरीस विलंब लागत असून खरेदी भाताची हुंडी शासनाला सादर केली असून मंजुरीनंतर शेतकºयांना त्यांची रक्कम अदा करण्यात येईल.
- विनय एडगे, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ

रजेवर असल्याने याबाबतची माहिती देऊ शकत नसून कार्यालयाशी संपर्क साधून ही माहिती घ्यावी.
- नरेंद्र रणमाळे, प्रादेशिक व्यवस्थापक, जव्हार

Web Title: Seven crore paddy straw purchases of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.