तानसा धरणाचे सात दरवाजे उघडले; ७७०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
By अजित मांडके | Published: July 26, 2023 12:59 PM2023-07-26T12:59:03+5:302023-07-26T13:00:03+5:30
तानसा धरण ओव्हर फ्लो...
ठाणे : तुळशी तलाव पाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण हे ओव्हर फ्लो झाला आहे. बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास धरण भरून वाहण्यास सुरुवात झाल्यावर एक दरवाजा उघडण्यात आला होता. मात्र दुपारी बारा वाजेपर्यंत तब्बल सात दरवाजे उडून ७७०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. अशी माहिती ठाणे जिल्हा प्रशासनाने दिली.
पाच दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवारी २२ जुलै रोजी धरण भरून वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती, त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडी इतकी आहे. २२ जुलै रोजी ही पातळी १२६.६०२ मीटर टीएसडी हुन जास्त झाली आहे. त्यामुळे ते धरण ओसंडून वाहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने तानसा धरणाखालील व नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या धरणातून विसर्ग होत असल्याने ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई - मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी विहार तलाव मध्यरात्री ००. ४८ तर तानसा तलाव ही आज पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी भरुन वाहू लागले pic.twitter.com/EgcjCoh79P
— Lokmat (@lokmat) July 26, 2023
उपयुक्त पाणीसाठा
धरण टक्केवारी आजची
तानसा 99.95
बारवी 80.76
भातसा 61.72
मध्य वैतरणा 67.95
मोडकसागर 87.69