पावणेसात लाख ठाणेकरांनी ना वाहतूक नियम पाळला, ना दंड भरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:14 AM2021-02-18T05:14:52+5:302021-02-18T05:14:52+5:30

टेम्पलेट आहे जितेंद्र कालेकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियम पाळा, असे वारंवार रस्ता सुरक्षा अभियानासारखी ...

Seven lakh Thanekars did not follow traffic rules and did not pay fines! | पावणेसात लाख ठाणेकरांनी ना वाहतूक नियम पाळला, ना दंड भरला!

पावणेसात लाख ठाणेकरांनी ना वाहतूक नियम पाळला, ना दंड भरला!

Next

टेम्पलेट आहे

जितेंद्र कालेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियम पाळा, असे वारंवार रस्ता सुरक्षा अभियानासारखी मोहीम राबवून ठाणे शहर वाहतूक पोलीस आवाहन करीत आहेत. तरीही गेल्या वर्षभरात तब्बल सहा लाख ७१ हजार ८९१ बेफिकीर चालकांनी ना नियम पाळला, ना दंड भरला. गेल्या वर्षभरात २० कोटी ६७ लाख ४७ हजार ५०० इतकी दंडाची रक्कम चालकांनी थकविल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.

वाहनचालकांनी नियमांचे पालन करण्यासाठी ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने गेल्या महिनाभरात विविध उपक्रम राबवून जनजागृती केली. नियम तोडून दंड न भरणाऱ्या वाहनचालकांविरुद्धही पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी डिसेंबर २०२० पासून विशेष मोहीम सुरू केली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात २६ कोटी ९८ लाख ८० हजार १५० इतका दंड चालकांनी थकविला होता. तो न भरल्यास वाहन जप्तीचाही इशारा ठाणे वाहतूक शाखेने दिल्यानंतर मात्र अगदी नामांकित सेलिब्रिटींसह काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही वाहतूक शाखेच्या कार्यालयांमध्ये जाऊन दंडाचा भरणा केला. आतापर्यंत सहा कोटींची थकबाकी वसूल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कारवाई - ६,७१,८९१

दंड - ६,२१,३२,६५०

अशी आहे आकडेवारी

कारवाई

नो पार्किंग - १,५६,०४८

धोकादायक वाहन - ९,७१५

ट्रिपल सीट - ७,७३१

विना परवाना - २,०५३

मोबाईलवर बोलणे - ९,७४३

अधिक वेग - २,८९१

.............................

कारवाई झालेले वाहनचालक -

वाहन चालकाकडील थकीत दंड -

कोट

फेब्रुवारी २०१९ पासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ई चलानद्वारे दंड वसुली सुरू केली. मात्र, यात दंड वसुलीचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे वाहनधारकांवर कारवाईचा वचक राहत नव्हता. म्हणून डिसेंबर २०२० पासून आजतागायत प्रलंबित ई चलान दंड वसुली अभियान सुरू केले. आतापर्यंत तब्बल सहा कोटींपर्यंत दंड वसुली झाली. यात डिसेंबर या एकाच महिन्यात तीन कोटी २३ लाख इतकी विक्रमी दंड वसुली झाली. ही मोहीम तीव्रपणे राबविली जाणार आहे.

बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

.................

...तर वाहन परवाना रद्द

दंड न भरल्यास एखाद्याचा वाहनपरवाना रद्द करण्याची तरतूद नाही. मात्र, वाहतूक नियम मोडणाऱ्या ६४७ वाहनचालकांचे परवाने गेल्या वर्षभरात निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) पाठविला. यात अधिक वेगाचे १९, मोबाईलवर बोलणारे १०२, सिग्नल तोडणारे १११ आणि ४०९ मद्यपी वाहनचालकांचे परवाने निलंबित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Seven lakh Thanekars did not follow traffic rules and did not pay fines!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.