अल्प दरात कार देण्याचे अमिष दाखवून सात लाखांची फसवणूक
By admin | Published: July 6, 2017 08:41 PM2017-07-06T20:41:07+5:302017-07-06T20:41:07+5:30
अल्प दरात कार देण्याचे अमिष दाखवून राबोडीतील एका व्यापाऱ्याची सात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार वृंदावन भागात घडला.
आॅनलाइन लोकमत
ठाणे, दि.06 - अल्प दरात कार देण्याचे अमिष दाखवून राबोडीतील एका व्यापाऱ्याची सात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार वृंदावन भागात घडला. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृंदावन सोसायटीतील एका रहिवाशाला जॉडन रेवीस, रवी कुमार आणि जितेंद्र सिंग या तिघांनी १९ ते २० जून २०१७ या काळात अल्प दरात कार देण्याचे अमिष दाखवून सुरुवातीला एक लाख ७० हजार नंतर पाच लाख ३० हजार असे सात लाख रुपये उकळले. आधी नवी दिल्लीच्या जितेंद्र सिंग यांच्या बँक आॅफ बडोदा येथील हरीनगर शाखेत त्यांनी पैसे भरले. तर दुसऱ्या वेळी रविकुमार यांच्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नवी दिल्लीतील ओक्ला फेज एक येथील शाखेत त्यांनी हे पैसे भरले. हे पैसे भरुनही त्यांना कार न मिळाल्याने अखेर त्यांनी याप्रकरणी ५ जुलै रोजी तक्रार दाखल केली.