बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण उधळणाऱ्या सात मनसैनिकांना पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 05:35 AM2018-05-09T05:35:53+5:302018-05-09T05:35:53+5:30

सोमवारी दिवा नजिक सुरू असलेल्या बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण उधळणाऱ्या दीडशे मनसैनिकांपैकी काही पदाधिकाºयांना शीळ-डायघर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले.

Seven MNS Party Workers arrested by the police | बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण उधळणाऱ्या सात मनसैनिकांना पोलिसांकडून अटक

बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण उधळणाऱ्या सात मनसैनिकांना पोलिसांकडून अटक

Next

ठाणे  - सोमवारी दिवा नजिक सुरू असलेल्या बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण उधळणाऱ्या दीडशे मनसैनिकांपैकी काही पदाधिकाºयांना शीळ-डायघर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशिरा यातील काहींना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक केली. तर दोन शेतकºयांसह उर्वरित कार्यकर्त्यांना सोडून दिले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेन विरोधी घेतलेल्या भूमिकेनंतर ठाण्यातील मनसे पदाधिकाºयांनी ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली शीळफाटा येथे सुरू असलेल्या बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण सोमवारी अक्षरश: उधळून लावले. सर्व्हेक्षण होऊ न देण्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली. मंगळवारी दुपारी ३.३० वा. शीळफाटा येथील दत्त मंदिरात मनसे पदाधिकारी आणि परिसरातील शीळ व पडले गावातील शेतकºयांसोबत बैठक आयोजिली होती. या बैठकीत शेतकºयांनी या सर्व्हेक्षणाला विरोध असल्याची व्यथा मांडल्याचे मनसे पदाधिकाºयांनी सांगितले. या चर्चेत राजेश कदम व रवींद्र मोरे यांनी संबंधित अधिकाºयांना भेटून जोपर्यंत विरोध आहे तोपर्यंत सर्व्हे थांबवावे,असे निवेदन देण्याचे ठरविले. अर्धा तास चर्चा झाल्यावर त्या ठिकाणाहून मनसे पदाधिकारी शेतकºयांना सर्व्हेक्षण सुरू असलेल्या ठिकाणी घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांच्यासह दोन शेतकºयांनाही ताब्यात घेतले.
यात मनसे उपाध्यक्ष राजेश कदम, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, मनविसे ठाणे शहर अध्यक्ष संदीप पाचंगे, उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे, मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे, शहर सचिव विनायक रणपिसे, प्रभाग अध्यक्ष जनार्दन खारीवले, मनविसे शहर सचिव प्रतिश मोरे, शाखाध्यक्ष सागर भोसले, प्रभाग अध्यक्ष दिनेश पाटील, उपविभाग अध्यक्ष शरद पाटील, मनविसे शाखाध्यक्ष कुशल पाटील, जयेश भगत अशा १३ पदाधिकाºयांसह तर नंदकुमार पाटील व निलेश वासकर या दोन शेतकºयांचा समावेश होता.
त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मनसेचे नेते राजू पाटील यांच्या मध्यस्थीनंतर सरकारी कामात अडथळा आणणे आणि बेकायदेशीर जमाव गोळा करणे या गुन्ह्यांतर्गत यातील सात जणांना शीळ डायघर पोलिसांनी अटक केली. तर दोन शेतकºयांसह उर्वरिताना सोडून दिले. अटक केलेल्या सात जणांमध्ये रवींद्र मोरे, मनविसे ठाणे शहर अध्यक्ष संदीप पाचंगे, उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे, मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे, शहर सचिव विनायक रणपिसे, प्रभाग अध्यक्ष जनार्दन खारीवले,कुशाल पाटील यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

दडपशाहीचा मार्ग सरकार आजमावत आहे. या दडपशाहीला आम्ही घाबरणार नाही. आमचे आंदोलन सुरू राहणार आहे. बुधवारपासून हे आंदोलन गनिमी काव्याने केले जाईल.
- अविनाश जाधव, ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष

Web Title: Seven MNS Party Workers arrested by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.