संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
By कुमार बडदे | Updated: June 15, 2024 22:20 IST2024-06-15T22:19:48+5:302024-06-15T22:20:26+5:30
या घटनेत ऐकून सात जण जखमी झाले असून यामध्ये एका महिलेचा समावेशा आहे.उपचारासाठी त्यांना स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मुंब्रा अग्निशमन दलाचे उपस्थानक अधिकारी गणेश खेताडे यांनी दिली.

संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
मुंब्राः छोट्या वाहनांसाठी तसेच पादचा-यासाठी बनवण्यात आलेल्या रस्त्यावरून चाललेला सिमेंट मिक्सर रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका गृहसंकुलाची भिंत तोडून गृहसंकुलाच्या परीसरात कोसळल्या मुळे झालेल्या अपघातात एका महिलेसह ऐकून सात जण जखमी झाले.
मुंब्रा पोलिस ठाण्या समोरील सम्राट नगर परीसरातून गावदेवी वसाहती मध्ये जाण्यासाठी बाधण्यात आलेल्या रस्त्यावरून शनिवारी रात्री एक सिमेंट मिक्सर सम्राट नगरच्या दिशेने येत होता. त्यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे मिक्सर प्रथमेश सोसायटीची संरक्षक भिंत तोडून सोसायटीच्या परीसरात कोसळला.
या घटनेत ऐकून सात जणा जखमी झाले असून यामध्ये एका महिलेचा समावेशा आहे.उपचारासाठी त्यांना स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मुंब्रा अग्निशमन दलाचे उपस्थानक अधिकारी गणेश खेताडे यांनी दिली. याबाबतची माहिती मिताच आमदार जिंतेद्र आव्हाड,राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेश चिटणिस सय्यद अल्ली उर्फ भाईसहाब,राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या युवती विभागाच्या अध्यक्षा पल्लवी जगताप याःनी घटनास्थळी धाव घेतली.