बर्ड फ्लू नियंत्रणासाठी जिल्ह्यात सात पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 01:15 AM2021-01-14T01:15:26+5:302021-01-14T01:15:35+5:30

जिल्ह्यातील बर्ड फ्लूच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक मंगळवारी झाली. यावेळी ठामपाचे अतिरिक्त आयुक्त हेरवाडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विजय धुमाळ, ठाणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

Seven squads in the district for bird flu control | बर्ड फ्लू नियंत्रणासाठी जिल्ह्यात सात पथके

बर्ड फ्लू नियंत्रणासाठी जिल्ह्यात सात पथके

Next

ठाणे : जिल्ह्यात बर्ड फ्लूबाबत आरोग्य, पशुसंवर्धन यंत्रणा सतर्क आहे. याबाबत योग्य ती खबरदारी व उपाययोजना करण्यासाठी सात पथके नेमली आहेत.  महापालिकांनीही त्यांच्या स्तरावर पथके स्थापन केली आहेत. यामुळे जनतेने घाबरू नये. अफवांवरही विश्वास ठेवू नये. बर्ड फ्लूविषयी कोणी अफवा पसरवल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची तंबीही ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील बर्ड फ्लूच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक मंगळवारी झाली. यावेळी ठामपाचे अतिरिक्त आयुक्त हेरवाडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विजय धुमाळ, ठाणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद डॉ. लक्ष्मण पवार, उपवनसंरक्षक हिरे व सर्व मनपाचे अधिकारी उपस्थित होते. सात पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण प्राधान्याने पूर्ण करून पशुवैद्यकीय विभागाबरोबरच ग्रामपंचायत, वनविभाग पातळींवर निगराणीचे आदेशही त्यांनी दिले. जिल्ह्यात पक्षी स्थलांतरासाठी ज्या काही पाणथळाच्या जागा असतील तेथे लक्ष देण्याच्या सूचना वनविभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 
याशिवाय जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षही स्थापन केला आहे. 

‘चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका’
बर्ड फ्लूसंदर्भात अपुऱ्या व चुकीच्या माहितीवर कोणी जर दिशाभूल केली अथवा अफवा पसरविल्या तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करू, असा सक्त इशारा नार्वेकर यांनी दिला. पोल्ट्री व्यावसायिकांनी सर्व कर्मचारी मास्क, सॅनिटायझरचा वापर करतील, स्वच्छता पाळतील याची दक्षता घ्यावी तसेच विक्रेत्यांनीही खबरदारी घ्यावी, अशा सुचनाही त्यांनी केल्या.

नियंत्रण कक्षाला कळवा 
nकावळे, पोपट, बगळे, स्थलांतरित होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळल्यास तत्काळ माहिती द्यावी, पोल्ट्री फार्ममधील पक्षी नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी. 
nजिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाशी ०२२-२५६०३३११ तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ वर संपर्क साधावा. नागरिकांनी मृत पक्ष्यांची  विल्हेवाट लावू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

अंडी व कुक्कुट मांस ७० अंश सेंटिग्रेड तापमानावर शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने ते खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही नार्वेकर यांनी केले आहे.

Web Title: Seven squads in the district for bird flu control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे