सात हजार प्रवाशांची सुरक्षा एका पोलिसावर; ठाणे लोहमार्ग पोलिसांची हद्द कळंबोलीपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:15 AM2020-03-12T00:15:07+5:302020-03-12T00:15:46+5:30

आठ तास ड्युटीमुळे तीन शिफ्ट झाल्याने सध्या एका शिफ्टसाठी एका स्थानकावर दोन पोलीस दिले जात आहेत.

Seven thousand passengers are protected by a police; Thane Lohmar police station to Kalamboli | सात हजार प्रवाशांची सुरक्षा एका पोलिसावर; ठाणे लोहमार्ग पोलिसांची हद्द कळंबोलीपर्यंत

सात हजार प्रवाशांची सुरक्षा एका पोलिसावर; ठाणे लोहमार्ग पोलिसांची हद्द कळंबोलीपर्यंत

Next

पंकज रोडेकर

ठाणे : ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठाणे रेल्वेस्थानक असो, या कळवा, मुंब्रा किंवा दिवा, या रेल्वेस्थानकांत प्रवाशांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच या पोलीस ठाण्याची हद्द ही थेट क ळंबोलीपर्यंत पसरलेली आहे. उपरोक्त या चार स्थानकांतून दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही ११ लाखांच्या पुढे गेली आहे. लोहमार्ग पोलिसांच्या मंजूर संख्येपेक्षा प्रवासी संख्या प्रचंड आहे. यामुळे एका पोलिसांच्या खांद्यावर सुमारे सात हजार प्रवाशांच्या सुरक्षेचा भार पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे लोहमार्ग पोलिसांची हद्द ही कोपरी ते दिवा आणि दिवा ते पुढे थेट कळंबोली अशी पसरलेली आहे. ठाणे ते दिवा या चार रेल्वेस्थानकात दिवसेंदिवस गर्दी वाढत असून, ठाणे आणि दिवा ही गर्दीची रेल्वेस्थानके म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. ठाण्यातून सुमारे सात ते आठ लाख प्रवासी दररोज ये-जा करतात. तर इतर तीन रेल्वे स्थानकांतील प्रवाशांची संख्या लक्षात घेतल्यास ती मिळून ११ लाखांच्या पुढे जात आहे. त्यातच जीआरपी पोलिसांच्या हद्दीत गतवर्षात घडणाºया चोरीच्या घटनांची संख्याही जवळपास चार हजारांच्या घरात गेली आहे. मात्र, जीआरपीच्या एकूण २०२ मंजूर पदांपैकी १९० इतकेच पोलीस अधिकारी-कर्मचारी सध्या कार्यरत असून त्यातील ४०-४५ जणांपैकी काही जण प्रतिनियुक्तीवर, आजारपणाच्या सुट्टीवर, गैरहजर, काही महिला पोलीस ह्या प्रसूती रजेवर गेल्याने अवघ्या १५० इतक्या पोलिसांवर पोलीस ठाण्यातील कामकाजासह प्रवासी सुरक्षेची जबाबदारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, सरकारने तातडीने पोलिसांची संख्या वाढवावी अशी मागणी येथील प्रवाशांकडून केली जात आहे. प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने गुन्ह्यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे.

होमगार्ड कमी केल्याने वाढला कामाचा ताण
मध्यंतरी जीआरपीच्या मदतीला ६० होमगार्ड आणि २२ महाराष्टÑ सुरक्षाबलाचे जवान तैनात होते. त्यातील ६० होमगार्डची फौज गेल्या काही दिवसांपूर्वी कमी केली गेली आहे. हे होमगार्ड जीआरपीसह रेल्वे फलाट, लोकलच्या महिला डब्यात आदी ठिकाणी पाहण्यास मिळत होते.

आठ तास ड्युटीमुळे तीन शिफ्ट झाल्याने सध्या एका शिफ्टसाठी एका स्थानकावर दोन पोलीस दिले जात आहेत. तर १२ तासांच्या शिफ्टसाठी चार पोलीस एका स्थानकाला दिले जात होते. ठाण्यासह कल्याण या रेल्वेस्थानकांच्या हद्द कमी करून तेथे दोन नवीन स्थानक तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.

होमगार्ड कमी झाल्याने आलेल्या ताणासह मोठ्या हद्दीबरोबर चार प्रमुख स्थानकांवरील वाढत्या प्रवासी संख्येमुळे लोहमार्ग पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यातच प्रवासी संख्याही वाढत असली तरी पोलिसांची संख्या कधी वाढणार, असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Web Title: Seven thousand passengers are protected by a police; Thane Lohmar police station to Kalamboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.