कळवा येथून अपहरण झालेल्या सात वर्षीय मुलाचा ४८ तासांमध्ये लागला शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 11:31 PM2021-06-22T23:31:35+5:302021-06-22T23:35:38+5:30

कळवा येथून अपहरण झालेल्या सात वर्षीय मुलाचा अवघा ४८ तासांमध्ये शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. अपहरणकर्त्याबाबत अजूनही तपास सुरु असून सीसीटीव्हींची पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्या अपहरणातील आरोपी अजूनही स्पष्ट झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

A seven-year-old boy abducted from Kalwa was found within 48 hours | कळवा येथून अपहरण झालेल्या सात वर्षीय मुलाचा ४८ तासांमध्ये लागला शोध

ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकची कामगिरी

googlenewsNext
ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकची कामगिरीओळखीतील व्यक्तीनेच अपहरण केल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कळवा येथून अपहरण झालेल्या सात वर्षीय मुलाचा अवघा ४८ तासांमध्ये शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. या मुलाला मंगळवारी पहाटेच्या सुमारास कुर्ला भागातून ठाणे पोलिसांनी शोधून त्याच्या आईच्या ताब्यात सुपूर्द केले.
कळवा, जयभीम नगर क्रमांक दोन येथील महात्माफुले नगर एमआयडीसी पाईपलाईनजवळ राहणाऱ्या या सात वर्षीय मुलाचे खेळतांना कोणीतरी अपहरण केल्याची तक्रार ३५ वर्षीय महिलेने कळवा पोलीस ठाण्यात २१ जून रोजी दाखल केली. हा मुलगा घरासमोर खेळत असतांना २० जून २०२१ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाला होता. याप्रकरणी समांतर तपास करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या मार्गदर्शनाखाली या अपहरणाचा युनिट एकने समांतर तपास सुरु केला. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक योगेश काकड यांनी मुलाच्या अपहरणाची माहिती खबरी आणि पोलिसांच्या व्हॉटसअ‍ॅप गृपवर फोटोसह प्रसारित केली होती. त्याच दरम्यान, हा मुलगा कुर्ला परिसरात असल्याची माहिती काकड यांना एका खबºयाकडून व्हॉटसअ‍ॅपवर मिळाली. ही माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक काकड, उपनिरीक्षक कैलास सोनवणे, जमादार आनंदा भिलारे, हवालदार अजय साबळे, पोलीस नाईक दादा पाटील, भगवान हिवरे आणि पोलीस अंमलदार माधुरी जाधव आदींच्या पथकाची निर्मिती करण्यात आली. कुर्ला येथील नेहरुनगर पोलीस ठाण्यात तो होता. या पथकाने नेहरुनगर पोलीस ठाण्यात जाऊन मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याला आता त्याच्या आईच्या ताब्यात दिल्याची माहिती वरिाष्ठ पोलीस निरीक्षक कोकणी यांनी दिली.
* मुलाकडून मिळाली वेगवेगळी माहिती-
अपहरणानंतर थेट कुर्ला भागात तो कसा पोहचला याबाबत या मुलाने वेगवेगळी उत्तरे दिली आहेत. सुरुवातीला त्याच्याच आईच्या एका मित्राचे त्याने नाव घेतले. परंतू, यातील कोणत्याच बाबी सिद्ध न झाल्याने पोलिसांनी चौकशीनंतर त्याला सोडून दिले. अपहरणकर्त्याबाबत अजूनही तपास सुरु असून सीसीटीव्हींची पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्या अपहरणातील आरोपी अजूनही स्पष्ट झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: A seven-year-old boy abducted from Kalwa was found within 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.