सात वर्षांच्या मुलीचा विनयभंग, आईला मारहाण; २० वर्षीय आराेपीला पोलिसांनी केली अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: July 18, 2024 23:16 IST2024-07-18T23:15:31+5:302024-07-18T23:16:22+5:30
श्रीनगर पाेलिसांची कारवाई

सात वर्षांच्या मुलीचा विनयभंग, आईला मारहाण; २० वर्षीय आराेपीला पोलिसांनी केली अटक
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: अवघ्या सात वर्षांच्या मुलीचा विनयभंग करून तिच्या आईला शिवीगाळ करीत मारहाण करून धमकी देणाऱ्या नितीन गुप्ता (२०) या आराेपीला अटक केल्याची माहिती श्रीनगर पाेलिसांनी गुुरुवारी दिली. आराेपीला न्यायालयीन काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.
वागळे इस्टेट भागात राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीशी नितीन याने १४ जुलै २०२४ राेजी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान गैरकृत्य केले. मुलीच्या भावाने रात्री आई घरी आल्यावर तिला झाला प्रकार सांगितला. याच प्रकाराचा जाब विचारण्यासाठी मुलीची आई आराेपीच्या घरी गेली. त्यावेळी त्याने तिला शिवीगाळ करून मारहाण केली व धमकी दिली. भारतीय न्याय संहिता कलम ७४ (विनयभंग) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम ८ आणि १२ कलमांखाली त्याच्याविरुद्ध श्रीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सुनील झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस उपनिरीक्षक किशाेर बाेडके यांच्या पथकाने आराेपी नितीन याला १७ जुलै राेजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास अटक केली.