सात वर्षांच्या हुनेन शेखने पूर्ण केले रमजानचे उपवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:38 AM2021-05-16T04:38:57+5:302021-05-16T04:38:57+5:30
ठाणे : महागिरी भागातील रशीद शेख यांचा मुलगा हुनेन रशीद शेख याने आपल्या आई-वडिलांकडे हट्ट करून वयाच्या ७ व्या ...
ठाणे : महागिरी भागातील रशीद शेख यांचा मुलगा हुनेन रशीद शेख याने आपल्या आई-वडिलांकडे हट्ट करून वयाच्या ७ व्या वर्षी रमजानच्या पवित्र महिन्याचे संपूर्ण ३० दिवस उपवास केले. एवढ्या लहान वयात ३० दिवसांचे कडक उपवास जमणार नाही असे आई-वडिलानी सांगूनही त्याने हट्ट करून हे उपवास धरले. दोन-तीन दिवसांत तो आपला हट्ट सोडेल, असे त्यांना वाटले; पण हुनेनने हे उपवास सलग तीस दिवस पूर्ण करून रमजान ईद साजरी केली. यामुळे त्याचे परिसरातील सर्वांनी कौतुक केले. विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या वस्तू-चाॅकलेट बाॅक्सची ईदी देऊन त्याचा सत्कार केला. ठाणे जिल्हा इंटक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन शिंदे, भारतीय जनता पार्टीचे विशाल वाघ आदींनी त्याचा सत्कार करून कौतुक केले.