सात वर्षीय व्योमचे 18 अध्याय तोंडपाठ; भगवत गीता पाठांतर परिक्षेत पटकावला पहिला क्रमांक

By मुरलीधर भवार | Published: August 30, 2022 06:40 PM2022-08-30T18:40:08+5:302022-08-30T18:43:00+5:30

खंबाळपाडा येथील अबोली स्टेट या सोसायटीत राहणारा व्योम हा त्याची आई श्रद्धा, वडिल ओंकार,आजी उज्ज्‍वला, आजोबा पद्माकर यांच्यासोबत राहतो. व्योम हा सिस्टर निवेदिता इंग्रजी शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत आहे. त्याच्या आजी उज्‍जवला यांनी त्याला भगवत गीता शिकवली. 

Seven-year-old Vyom recites 18 chapters; Took first rank in Bhagwat Gita recitation exam | सात वर्षीय व्योमचे 18 अध्याय तोंडपाठ; भगवत गीता पाठांतर परिक्षेत पटकावला पहिला क्रमांक

सात वर्षीय व्योमचे 18 अध्याय तोंडपाठ; भगवत गीता पाठांतर परिक्षेत पटकावला पहिला क्रमांक

googlenewsNext

डोंबिवली- अवघे सात वर्षाचे वय असताना डोंबिवलीतील व्योम दाभाडकर याचे भगवत गीतेचे (Bhagwat Gita) 18 अध्याय तोंडपाठ आहेत. कर्नाटकातील शृंगेरी येथे शारदा पिठातील शंकरचार्यांमसमोर भगवद्गीता पाठांतर परीक्षेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व्योमला मिळाले आहे. शंकराचार्यांच्या हस्ते त्याचा  एकवीस हजार रुपये आणि प्रमाणपत्र  देऊन विशेष गौरव करण्यात आला.

खंबाळपाडा येथील अबोली स्टेट या सोसायटीत राहणारा व्योम हा त्याची आई श्रद्धा, वडिल ओंकार,आजी उज्ज्‍वला, आजोबा पद्माकर यांच्यासोबत राहतो. व्योम हा सिस्टर निवेदिता इंग्रजी शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत आहे. त्याच्या आजी उज्‍जवला यांनी त्याला भगवत गीता शिकवली. 

कल्याणच्या श्री गुरु कूलूम न्यास या संस्थेतून आजी उज्जवला यांनी 2क्19 मध्ये कर्नाटकामधील शृंगेरी येथे शारदा पिठातील शंकरचार्यांमसमोर भगवत गीता  पाठांतर परीक्षेत प्रथम क्र मांकाचं पारितोषिक मिळविले होते. आपली आजी श्लोक म्हणत असल्याचे व्योम ने ऐकले  त्याचे वाढत गेले. त्याने आजीकडे श्लोक शिकण्यासाठी हट्ट धरला याच दरम्यान आजीचे श्लोक पठण ऐकून वयाच्या चौथा वर्षी त्याला श्लोक उच्चारासह पाठ झाले होते. ते त्याने बोलून दाखवले त्यामुळे आजी उज्वला यांनी व्योमला श्लोक शिकवण्याचा निश्चय केला.

आपल्या आजीच्या पावलावर पाऊल ठेवत व्योमनेदेखील गीता पठणातला एक वर्षापूर्वी सुरुवात केली. त्यानंतर त्याने अवघ्या वर्षभरामध्ये गीतेचे संपूर्ण अठरा अध्याय  तोंडपाठ केले. या अध्यया मध्ये एकूण सातशे श्लोक आहेत .अवघ्या सात वर्षाच्या व्योम ने भगवद्गीतेचे 18 अध्याय शास्त्रशुद्ध उच्चारणासह पूर्ण पाठ केले आहेत. कोणत्याही अध्यायातील कोणत्याही श्लोकाची नुसतीच  सुरुवात जरी सांगितली की तो पुढील संपूर्ण श्लोक सांगू शकतो. 

त्यानंतर मागील आठवडयातच कर्नाटक शृंगेरीला ब्रह्मवृंद गुरु  यांच्या समक्ष आणि शंकराचार्य यांच्या उपस्थितीत सतराव्या अध्याय एकही चूक न करता संपूर्ण बोलून दाखवला. इतक्या लहान मुलाचे संपूर्ण अध्याय पाठ असल्याने त्याच्या या कामिगरीचे तेथील श्री श्री जगद्गुरु  शंकराचार्य महासंस्था यांनी विशेष कौतुक करून त्याला प्रशस्तीपत्न देऊन गौरव केला आहे. 

व्योमच्या आजी उज्ज्वला यांनी सांगितले की, श्री गुरुकूलम न्यासच्या अध्यक्षा मंजिरी फडके यांच्याकडून मी प्रथम शिकविले. त्यानंतर नातवलाही शिकवले. वर्षभर या संस्थेत सराव करुन घ्यावा लागतो. त्यामुळे व्योमच्या यशात सगळ्य़ांचे श्रेय आहे. घरच्यांची साथ आणि योगेश्वराची कृपा  यामुळे हे शक्य झाले. 
 

Web Title: Seven-year-old Vyom recites 18 chapters; Took first rank in Bhagwat Gita recitation exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.