लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला सात वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 10:27 PM2020-01-20T22:27:43+5:302020-01-20T22:35:15+5:30

लग्नाचे प्रलोभन दाखवून एका २३ वर्षीय मागासवर्गीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाºया नविनकुमार तिवारी (३१) या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. अत्याचाराच्या कलमांतर्गतसात वर्ष कारावास आणि ३० हजार रुपये दंड तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत एक वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेमधील ३० हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

Seven-year sentence for sexually assaulting a teenage girl | लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला सात वर्षांची शिक्षा

अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गतही दोषी असल्याचे सिद्ध

Next
ठळक मुद्देअ‍ॅट्रॉसिटी अंतर्गतही दोषी असल्याचे सिद्ध ३५ हजारांचा दंडही ठोठावला३० हजारांची रक्कम पिडितेला देण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लग्नाचे प्रलोभन दाखवून एका मागासवर्गीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणा-या नविनकुमार प्रेमशंकर तिवारी (३१) या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा शनिवारी ठोठावली आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गतही एका वर्षाच्या कारावासाची तसेच ३५ हजारांच्या दंडाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे.
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील रहिवाशी नविनकुमार याचे मागासवर्गीय युवतीसोबत पाच वर्षांपूर्वी प्रेम जुळले होते. हे दोघेही कुर्ला येथील एका कॅटरिंगमध्ये काम करीत होते. तिथेच त्याने तिला लग्नाचे अमिष दाखवून मुंब्रा कॉलनी येथील एका भाड्याच्या घरात ठेवले. पती पत्नीप्रमाणे वास्तव्य करून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. प्रत्यक्ष लग्नाचे नाव तिने काढल्यानंतर मात्र तो तिला टाळाटाळ करीत होता. तेंव्हा तिने त्याच्या खोपोली येथील घरी जाऊन त्याच्या आईवडिलांकडे आपली कैफियत मांडली. त्यांनीही उच्चवर्णीय असल्यामुळे तिच्याशी मुलाचे लग्न लावून देण्यात असमर्थता दर्शविली. अखेर तिने याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे नविनकुमारसह त्याच्या आईवडिलांविरुद्ध तक्रार केली. आयोगाने हे प्रकरण मुंब्रा पोलिसांकडे वर्ग केले. मुंब्रा पोलिसांनी याप्रकरणी २०१४ मध्येच तिघांनाही अटक केली. त्यानंतर याप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते.
* आईवडिलांची निर्दोष मुक्तता
या खटल्याची १८ जानेवारी २०२० रोजी अंतिम सुनावणी झाली. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी आरोपीस कडक शिक्षा करण्यासाठी जोरदार बाजू मांडली. सर्व साक्षी पुरावे तसेच मुंब्रा पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारावर ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जी.पी. शिरसाट यांनी साक्षी पुरावे ग्राह्य मानून नविनकुमार याला लैंगिक अत्याचार कलम ३७६ अंतर्गत सात वर्ष कारावास आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत एक वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडामधील ३० हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. त्याच्या आईवडिलांची यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे या खटल्याकडे न्यायालयातील वकील, पोलीस आणि पीडितेच्या नातेवाईकांचे लक्ष लागले होते.

Web Title: Seven-year sentence for sexually assaulting a teenage girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.