ठाणेच्या शहापूर तालुक्यातील ९७ गावखेड्यात तीव्र टंचाई; १७ टँकरव्दारे पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 04:29 PM2019-04-07T16:29:05+5:302019-04-07T16:36:32+5:30
शहापूर तालुक्याप्रमाणेच मुरबाड तालुक्यातील आदिवासी गावपाडे तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. मात्र या गावपाड्याना अजूनही टँकर सुरू झाले नसल्याचे अहवालावरून दिसून येत आहे. पाणी टंचाईच्या या समस्येतून सुटका करण्यात येत नसल्याचा सवाल सध्याच निवडणूक प्रचारा दरम्यान उमेदवारांना विचारला जाण्याची शक्यता दिसून येत आहे. शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावखेड्यांच्या संख्येत दिवसन दिवस वाढ होताना दिसून येत आहे.
ठाणे : जिल्ह्यात निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच ग्रामीण, दुर्गम भागातील गावखेडे मात्र पिण्याच्या पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. शहापूर तालुक्यातील ९७ गावपाड्यांमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई सुरू आहे. त्यावर मात करण्यासाठी १७ शासकीय टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
शहापूर तालुक्याप्रमाणेच मुरबाड तालुक्यातील आदिवासी गावपाडे तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. मात्र या गावपाड्याना अजूनही टँकर सुरू झाले नसल्याचे अहवालावरून दिसून येत आहे. पाणी टंचाईच्या या समस्येतून सुटका करण्यात येत नसल्याचा सवाल सध्याच निवडणूक प्रचारा दरम्यान उमेदवारांना विचारला जाण्याची शक्यता दिसून येत आहे. शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावखेड्यांच्या संख्येत दिवसन दिवस वाढ होताना दिसून येत आहे. पंधरा दिवसापूर्वी ३७ गावखेड्यांमध्ये पुन्हा ६० गावांची वाढ होऊन सध्या त्यांना १७ टॅकरव्दारे पाणी पुरवठा होत आहे. यामध्ये २३ गावांसह ७४ आदिवासी पाड्यांचा समावेश आहे.
टंचाई सुरू होताच गावकऱ्यांनी वेळीच टँकरची मागणी करणे अपेक्षित आहे. संबंधीत गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीला प्राधान्य देऊन तत्काळ संबंधीत तहसिलदार व प्रांत यांच्याकडे पाटपुरावा करून गावपाट्यांना टँकने पाणी पुरवठा करण्याचे आदेश ही जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनाकडून संबंधीत अधिकाऱ्यांना जारी झाले आहेत. टँकर सुरू करण्याचे अधिकार आता स्थानिक प्रांत यांच्याकडे देण्यात आलेले. यासाठी पंचायत समिती व तहसीलदार कार्यालयांमधील समन्वयाने प्रांत यांच्याकडे टँकरने पाणी पुरवठा करण्याची गावकºयांकडून करणे अपेक्षित आहे.