भिंवडी तालुक्यातील तरीचा पाड्यात भीषण पाणीटंचाई, पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 08:27 PM2019-05-02T20:27:43+5:302019-05-02T20:28:52+5:30
भिवंडी तालुक्यातील कोन ग्रांमपंचायतीच्या अतर्गत असलेल्या तरीचापाडा या आदिवासी पाड्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
भिवंडी - भिवंडी तालुक्यातील कोन ग्रांमपंचायतीच्या अतर्गत असलेल्या तरीचापाडा या आदिवासी पाड्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने ग्रामस्थामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे या पाणी समस्येकडे भिवंडी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याने दरवर्षी या पाड्याला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
ठाणे जिल्हा परिषद भिवंडी पंचायतसमिती पाणी पूरवठा विभागाच्या अखत्यारित येणा-या कोन गावाच्यालगत वसलेल्या या पाड्यात पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग व कोनग्रामपंचायतीच्या वतीने बोरवेल व विहिर ही मारलेली नाही त्यामूळे अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना पाण्यासाठी कधी कल्याण तर कोन गावाच्यालगत असलेल्या गोदामातील कामगांरांना पाणीपीण्यासाठी असलेल्या नळाचा आधार घ्यावा लागत आहे मुळात या पाड्यात शासनाच्या कूठल्याच योजना राबविण्यात आलेल्या नाहीत त्यामुले मेक इन इंडिया सबकासाथ सबका विकास ह्या यूती सरकारच्या घोषणा फक्त कागदावरच राहिल्याचे या वरून दिसते तर शौचालय पाणी सूविधाही नसल्याने स्वच्छभारत अभियानाचा पूरता बोजवारा उडाला आहे.
दुसरीकडे पाणीपूरवठा विभाग तालूक्यात पाणीटंचाई नसल्याचा कांगावा करित असतानाच देशाच्या स्वातत्र्याला एकात्तर वर्षातही येथील आदिवासी कष्टकरी समाजबांधवावर पाण्यासाठी भटक्रांती करण्याची वेल आली आहे याला जबाबदार आसणा-यांवर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली पाणीपूरवठा उपअभियंता राऊत शांखाअभियंता सु देश भास्करराव सासे आंधले हे कार्यालयात बसून वर्षभर काय काम करतात त्यांना पाणीटंचाई कधीच माहिती नसते याला काय म्हणायचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर भिवंडी पंचायत समिततीचे सभापती उपसभापती सदस्य यांनी पाणीटंचाईडे लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
भिवंडी पंचायत समिततीचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के हे पाणी टंचाई कडे कधी लक्ष देणार आहे नाहीतर आम्हालाच पंचायत समितीत हंडे घेऊन बसावे लागण्याची वेल ते पहात आहेत काय असा प्रश्र्न अनिता वाघ या कार्यकर्तीनी उपस्थित केला आहे.
हा पाडा कोन जिल्हा परिषद गटात येत असून या गटाचे जिल्हापरिषद सदस्य पंचायत समिती सदस्यांनी येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.