शेलार ग्राम पंचायत हद्दीत पाण्याची भिषण टंचाई; सारपंचांचा आंदोलनाचा इशारा
By नितीन पंडित | Published: September 7, 2022 05:09 PM2022-09-07T17:09:00+5:302022-09-07T17:09:54+5:30
शेलार ग्राम पंचायत हद्दीत सध्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: शहरालगत असलेल्या शेलार ग्राम पंचायत हद्दीत सध्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ऐन गणेशोत्सव काळात स्टेम वाटर कडून होणार पाणी पुरवठा अनियमित व कमी दाबाने येत असल्याने महिला व नागरिकांमध्ये स्टेम प्रशासनाबाबत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
शेलार ग्राम पंचायतीच्या पाणी पुरवठा लाईन वरून काटई खोणी गावाला पाणी पुरवठा करण्यात येत असून ही लाईन फक्त या गावांना पाणीपुरवठा सुरळीत होतो की नाही हे पाहण्यासाठी पाहणीसाठी जोडली असून सहा दिवसानंतर पुन्हा लाईन मिल्लात नगर येथील पाईप लाईनला जोडण्यात येईल असे स्टेमचे अभियंता प्रथमेश पाटील यांनी शेलार ग्रामपंचायतीला सांगितले होते मात्र आजपर्यंत यासंदर्भात कार्यवाही झाली नसून याबाबत स्टेम कडे वारंवार पाठपुरावा करूनही स्टेमचे अधिकारी हे उडवा उडवीची उत्तरे देत असल्याची माहिती शेलार ग्रामपंचायतीचे सरपंच ऍड किरण चन्ने यांनी दिली आहे.
स्टमचे अधिकारी व अभियंता देखील या पाणी समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने येत्या दोन दिवसात जर शेलार ग्रामपंचायतीला सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही तर ग्राम पंचायत शेलारच्या वतीने स्टेम विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील सरपंच किरण चन्ने यांनी स्टेम प्राधिकरणाला लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.