अंबरनाथ वडवली भागात तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:41 AM2021-03-27T04:41:29+5:302021-03-27T04:41:29+5:30

महिनाभरापासून वडवली भागातील अनेक वसाहतींमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. अनेक सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ...

Severe water shortage in Ambernath Vadavalli area | अंबरनाथ वडवली भागात तीव्र पाणीटंचाई

अंबरनाथ वडवली भागात तीव्र पाणीटंचाई

Next

महिनाभरापासून वडवली भागातील अनेक वसाहतींमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. अनेक सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने तो पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा होऊनदेखील दाब कमी असल्याने सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या भरण्यास विलंब होत आहे. काही पाण्याच्या टाक्या अर्धवट भरत असल्याने सोसायट्यांना टँकर मागविण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही. ही समस्या लक्षात घेऊन मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी या समस्येवर चर्चा केली. जागृत गल्ली आणि परिसरात पर्यायी जलवाहिनी टाकण्यात आली असून, त्या ठिकाणी पाण्याचा दाब वाढविल्यास पाण्याची समस्या सोडविण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनीदेखील सकारात्मकता दर्शविली आहे. दरम्यान, येत्या आठवडाभरात पाण्याची समस्या न सुटल्यास नागरिकांसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा लकडे यांनी दिला आहे.

चिखलोली धरणातून पाणीपुरवठा बंद झाल्याने त्याच्या मोबदल्यात एमआयडीसीकडून वाढीव पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र, तो पाणीपुरवठा अपुऱ्या प्रमाणात होत असल्याने अंबरनाथ शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच जीवन प्राधिकरणावर पाणी बिलापोटी मोठी थकबाकी असल्यानेदेखील एमआयडीसी वाढीव पाणीपुरवठा देण्यास चालढकल करीत आहे.

-------------

Web Title: Severe water shortage in Ambernath Vadavalli area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.