ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई, ४० हजार ग्रामस्थांना २६ टँकरद्वारे पाणी पुरवठा!

By सुरेश लोखंडे | Published: April 18, 2023 07:36 PM2023-04-18T19:36:34+5:302023-04-18T19:38:16+5:30

या गांवखे्यांच्या ४० हजार ग्रामस्थांना आजरोजी २६ खासगी टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे.

Severe water shortage in Shahapur taluka of Thane district, water supply to 40 thousand villagers through 26 tankers | ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई, ४० हजार ग्रामस्थांना २६ टँकरद्वारे पाणी पुरवठा!

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई, ४० हजार ग्रामस्थांना २६ टँकरद्वारे पाणी पुरवठा!

googlenewsNext

ठाणे: गावाजवळच्या धरणांचे पाणी जिल्ह्यातील शहराना पुरवणाऱ्या शहापूर तालुक्यातील १३४ गांवपाडे यंदा तीव्र पाणी टंचाईला तोंड देत आहेत. या गांवखे्यांच्या ४० हजार ग्रामस्थांना आजरोजी २६ खासगी टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे. या पाणी पुरवठ्यासाठी गेल्या वर्षाच्या तुलनेत आजरोजी दहा जादा टँकर गांवखे्यात धावत आहेत.

मुंबई या महानगराला पाण पुरवठा करणारे सर्व धरणे शहापूर तालुक्यातील गांवखेड्यांच्या आजूबाजूला आहेत. मात्र तेथील पाणी या गांवखेड्यांना मिळत नाही. त्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त शहापूर तालुका पाणी टंचाईला तोंड देत आहे. गेल्या वर्षी आजरोजी अवघे १६ टँकर पाणी पुरवठा करीत होते. मात्र आजच्या तारखेला यंदा २६टँकरव्दारे या १३४ गांवपा्यांना पाणी पुरवठा ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून केला जात आहे.तेथील ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी उन्हातान्हात भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात उष्णतेची लाट पसरली आहे.

जीव घेण्या उन्हामुळे या गावातील महिला व गांवकऱ्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरचे चातकाप्रमाणे वाट पाहावी लागत आहे. या शहापूरच्या २४ गांवे व ११० पाड्यांना तीव्र पाणी टंचाई सुरू झाली आहे. त्यावर २६ टँकरव्दारे मात करून या गांवपाड्यांची तहान भागवली जात आहे. त्यांच्या या पाणी समस्येवर मात करण्यासाठी राज्य शासनाने २०२० मध्ये भावली पाणी पुरवठा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचे कामाने आजपर्यंतही गती घेतलेली दिसून येत नसल्यामुळे गांवकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय.    

या टंचाईग्रस्त गांवाना २६ टँकरव्दारे पाणी पुरवठा-
- धामणी ग्राम पंचायतीमधील गोलभण, जरंडी गांवासह भुईपाडा.अजनुप ग्रा.प.चे तीन पाडे. ढाढरेची उंबरवाडी. कसारा- उंम्रावणे, दांड, बिबळवाडी, पायरवाडी. कोठारे-कोळीपाडा. नांदवळचे दोन पाडे. वेळुकचे पिंगळवाडी. उंबरखांडचा रातांधळेपाडा. फुगाळे, कोथळे, आपटे, पेंढरघोळ, माळ, विहिगांव, पळशीण, कळभोंडे, पेंढरी, नांदगांव आदी २४ गांवे व ११० पाड्यांमधील ४९ हजार ९६ ग्रामस्थांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
 

Web Title: Severe water shortage in Shahapur taluka of Thane district, water supply to 40 thousand villagers through 26 tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.