ठाणे जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र; शहापूर, मुरबाडला ४७ टॅकरने पाणी पुरवठा
By सुरेश लोखंडे | Published: May 24, 2024 06:15 PM2024-05-24T18:15:15+5:302024-05-24T18:15:41+5:30
यंदा या तालुक्यातील ४१ माेठे गांवे आणि १५१ आदिवासी पाडे आदी १९२ गांवपाडे यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहे
ठाणे : हर घर नळ! असे म्हणत नळाव्दारे मुबलक पाणी पुरवठा हाेत असल्याचे भासवत यंदा लाेकसभेच्या निवडणुका पार पडल्या. मात्र कधी नव्हे ते यंदा जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या दुर्गम, ग्रामीण भागात सर्वाधिक म्हणजे ४७ टॅंकरने पाणी पुरवठा करून ग्रामस्थांची तहाण भागवली जात असल्याचे ठाणे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ठ करण्यात आले आहे.
मुंबई, ठाणे या माेठ्या महानगरांना पाणी पुरवठा करून ठाणे जिल्ह्यातील ग्रामस्थ मात्र स्वत: तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहेत. यंदा अन्य वर्षांच्या तुलनेत मात्र पाणी टंचाई अधीक तीव्र झाल्यामुळे गांवापाड्यातील रहिवाशी त्रस्त आहेत. शहापूर, मुरबाड हे तालुके तीव्र टंचाईला ताेंड देत आहेत. तब्बल २१७ गांवपाड्यांमध्याील ७३ हजार ५७७ ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा साेसाव्या लागत आहेत. गेल्या वर्ष या दाेन तालुक्यात ४४ टॅंकरने गांवपाड्यांना पाणी पुरवठा झाला हाेता. त्यात वाढ हाेऊन तब्बल ४७ टॅंकर या ग्रामस्थांना यंदा पाणी पुरवठा करीत असल्याचे वास्तव उघड झाले आहे.
शहापूर हा शहारांना पाणी पुरवठा करणारा तालुका म्हणून प्रसिध्द आहे. यंदा या तालुक्यातील ४१ माेठे गांवे आणि १५१ आदिवासी पाडे आदी १९२ गांवपाडे यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहे. गेल्या वर्षी या गांवपाड्यांना ३९ टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात आला हाेता. यंदाचा उन्हाळा कडक असल्यामुळे त्यांचा पारा ३५ ते ४० अंशाच्या खाली येत नसलयामुळे पाणी समस्या गंभीर झाली. कधी नव्हे ते यंदा शहापूरला ४२ टॅकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाळा लांबल्यास या टॅकरच्या संख्येत वाढ हाेण्याची शक्यता आहे. फुगाळे, दांड, कळभाेंडे, काेथळे, माळ, वहिगांव, उमरावणे, उंबरखांड, पेंढाळघाेळ, पपिळपाडा, पेंढरी, पळशीण, शीळ, गाेलभण, जरंडी, पगिळवाडी, राहेडवहाळ आदी ६० हजार ४९ लाेकसंख्येच्या १५१ गांवे आणि १९२ पाड्यांना ४२ टॅकरने शहापूर तालुक्यात पाणी पुरवठा सुरू आहे.
मुरबाड तालुक्यांमधील १२ माेठी गांवे आणि १३ आदिवासी पाडे आदी २५ गांवपाडे यंदा तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहेत. त्यांना तब्बल पाच टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी चार टॅकरेने पाणी पुरवठा करण्यात आला हाेता. मात्र यंदा टंचाईच्या गांवपाड्यांसह टॅंकरच्या संख्येत माेठी वाढ झालेली आढळून आली आहे. यंदाच्या या टंचाईच्या झळा माेहघर, ताेडली, फांगुळगव्हाण, भाेरांडे, साकुर्ली, साजई, झाडघर, फणसाेली, डेहणाेली, घागुरली, पऱ्हे, देवपेख् आदी १२ गांवे आणि १३ पाड्यांनड्तीव्र टंचाई सुरू आहे.