उल्हासनगर खेमानी नाल्याचे सांडपाणी उल्हास नदीत, लाखो नागरिकांना दूषित पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 11:08 PM2024-06-01T23:08:27+5:302024-06-01T23:08:39+5:30

नदी पात्रात ज्या ठिकाणी खेमानी नाल्याचे सांडपाणी मिळते त्याच ठिकाणाहून एमआयडीसी पाणी उचलत आहे. 

Sewage from Ulhasnagar Khemani drain into Ulhas river, contaminated water for millions of citizens  | उल्हासनगर खेमानी नाल्याचे सांडपाणी उल्हास नदीत, लाखो नागरिकांना दूषित पाणी 

उल्हासनगर खेमानी नाल्याचे सांडपाणी उल्हास नदीत, लाखो नागरिकांना दूषित पाणी 

सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरातील खेमानी नाल्याचे सांडपाणी ओव्हरफ्लॉ होऊन उल्हास नदीत जात असल्याने नदीचे पाणी प्रदूषित असल्याची ओरड सुरू झाली. उल्हास नदी पात्रात ज्या ठिकाणी खेमानी नाल्याचे सांडपाणी मिळते त्याच ठिकाणाहून एमआयडीसी पाणी उचलत आहे. 

उल्हासनगर संच्युरी कंपनी जवळून वाहणाऱ्या उल्हास नदी पात्रातून एमआयडीसी पाणी उचलून उल्हासनगरसह इतर शहराला पाणी पुरवठा करते. नेमके त्याच ठिकाणी शहरातील सांडपाण्याचा खेमानी नाला नदीला मिळत असल्याने, नदीतील पाणी प्रदूषित होते. या प्रदूषित पाण्याचा पुरवठा लाखो नागरिकाला होत असल्याचा आरोप-प्रत्यारोप झाल्यावर, महापालिकेने खेमानी नाल्याचे पाणी विहिरीत अडविले जाते. अडविले पाणी पंपिंग करून शांतीनगर मलनिस्सारण केंद्रात आणून त्यावर प्रक्रिया करून नदी खाडीत सोडले जाते. यावर महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च केले. नाल्याचे सांडपाणी अडवलेल्या ठिकाणी तुंबून ओव्हरफ्लॉ होत नदी पात्रात जात असल्याचे चित्र आहे. यावर महापालिकेने त्वरित कारवाई करण्याची मागणी सामाजिक संस्थेकडून होत आहे.

 शहरातील खेमानी नाल्या प्रमाणे, म्हारळगावातून येणारा सांडपाणी नाला खेमानी नाल्यापुर्वी उल्हास नदीला मिळून नदीचे पाणी प्रदूषित करीत आहे. त्या नाल्याचे पाणी अडवून, त्यावर प्रक्रिया करून नदी ऐवजी नदी खाडीत पंपिंगद्वारे सोडण्याच्या मागणीने जोर धरला आहे. खेमानी नाल्याचे पाणी ज्याठिकाणी अडविले आहे. त्याठिकाणी नाल्यात वाहून येणाऱ्या कचऱ्यासाठी एक लोखंडी जाळी बसविली आहे. त्या जाळीला कचरा अडकुन पाणी ओव्हरफ्लॉ होऊन नदीत जात असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. महापालिका कोट्यावधी रुपये खर्चून ही परिस्थिती असून संबंधित ठेकेदार व महापालिका अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची गरज आहे. याबाबत महापालिका पाणी पुरवठा अभियंता परमेश्वर बुडगे यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही.

Web Title: Sewage from Ulhasnagar Khemani drain into Ulhas river, contaminated water for millions of citizens 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.