मीरा रोडमध्ये गटारातील दगड, डेब्रिजमुळे तुंबले सांडपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:35 PM2020-12-16T23:35:29+5:302020-12-16T23:35:33+5:30

गटाराचे बांधकाम करताना त्यातील दगड, डेब्रिज आदी काढले जात नसल्याने सांडपाणी तुंबण्याचे प्रकार नेहमीचे झाले आहेत.

Sewage in Mira Road due to gutter stones and debris | मीरा रोडमध्ये गटारातील दगड, डेब्रिजमुळे तुंबले सांडपाणी

मीरा रोडमध्ये गटारातील दगड, डेब्रिजमुळे तुंबले सांडपाणी

Next

मीरा राेड  : मीरा-भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार नेहमीच जाचक ठरत आला आहे. गटाराचे बांधकाम करताना त्यातील दगड, डेब्रिज आदी काढले जात नसल्याने सांडपाणी तुंबण्याचे प्रकार नेहमीचे झाले आहेत. मीरा रोडमध्ये अशाच एका गटारातून भला मोठा दगड जेसीबीने काढावा लागला. त्यासाठी चेेंबर तोडावे लागले.
मीरा- भाईंदरमध्ये गटार-नाले बांधण्याची कोट्यवधी रुपयांची कामे बांधकाम विभागाकडून काढली जातात. ही कामे काढण्यापासून ते कामाचा दर्जा आदींबद्दल तक्रारी होत असतात. गटार-नाल्यांचे काम करताना सांडपाणी ठेवण्यासाठी कंत्राटदाराकडून दगड, डेब्रिजच्या गोणी टाकून बांध केला जातो. दरम्यान, आतमध्ये काँक्रीट पडत असते. गटाराच्या स्लॅबसाठी वापरले जाणारे प्लायही काढले जात नाहीत. यामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार सतत होतात.
असाच प्रकार मीरा रोडच्या हटकेश भागात उघडकीस आला आहे. १५ क्रमांकाच्या बसथांब्याकडे जाणारे काँक्रीट स्लॅबचे गटार पालिकेने नुकतेच बांधले आहे. 
या परिसरातील गौरव रिजन्सी, ग्रीष्मा एन्क्लेव्ह आदी भागांतील सांडपाणी तुंबत असल्याच्या रहिवाशांच्या सतत तक्रारी येत होत्या. नगरसेविका अनिता मुखर्जी यांच्याकडे तक्रारी आल्यावर त्यांनी स्वच्छता निरीक्षक अनिल राठोड यांच्यासह परिसराची पाहणी केली. 

महामार्गावर अनेक त्रुटी
त्यावेळी गटारात मोठा दगड आढळला. सफाई कामगारांनी दगड काढण्याचा प्रयत्न केला, पण तो खूप मोठा आणि वजनदार असल्याने त्यांना शक्य झाले नाही. शेवटी बांधकाम विभागाला कळवण्यात आले. त्यानंतर जेसीबीने गटाराचे चेंबर तोडून आतील दगड बाहेर काढला तसेच डेब्रिजही काढले. आता तोडलेले चेंबर पुन्हा बांधले जात आहे. येथील हटकेश्वर शंकर मंदिरासमोर मोठा १२ फूट खोल नाला आहे. त्यातही बांधकामादरम्यानचे मोठे दगड तसेच असून सतत पाणी तुंबते, असे स्थानिकांनी सांगितले.

Web Title: Sewage in Mira Road due to gutter stones and debris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.