लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर ठाण्यात लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 07:59 PM2021-08-08T19:59:09+5:302021-08-08T20:02:38+5:30
लग्नाचे अमिष दाखवून घोडबंदर रोड भागात राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीवर ठाण्यात लैंगिक अत्याचार करणाºया धीरज पाटील (२७, रा. खांडपे, ता. भिवंडी, ठाणे) याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: लग्नाचे अमिष दाखवून घोडबंदर रोड भागात राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीवर ठाण्यात लैंगिक अत्याचार करणाºया धीरज पाटील (२७, रा. खांडपे, ता. भिवंडी, ठाणे) याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खांडपे गावातील धीरज आणि पिडित तरुणीची सोशल मिडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. याच ओळखीतून त्यांची मैत्री झाल्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात होते. यातूनच त्याने तिला लग्नाचे अमिष दाखविले. पुढे २ जानेवारी ते २३ जून २०२१ या काळात त्याने तिच्या इच्छेविरुद्ध कापूरबावडी भागातील एका लॉजवर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याच काळात त्याने तिच्याबरोबर साखरपुडाही केला. मात्र, लग्न करण्यास नकार दिला. तिने विचारणा केल्यानंतर मात्र तिचे विवस्त्र अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिला शिवीगाळ केली. या सर्वच प्रकाराला कंटाळून तिने अखेर त्याच्याविरुद्ध कलम ३७६, ५०४ आणि ५०६ या कलमान्वये काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र, हा संपूर्ण प्रकार कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेला असल्यामुळे पोलीस उपायुक्त विनय राठोड यांच्या आदेशाने हे प्रकरण ७ आॅगस्ट २०२१ रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. मोसमकर हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.