अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन निर्घृण हत्या: आरोपीला अजन्म कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 11:31 PM2020-12-14T23:31:40+5:302020-12-14T23:34:09+5:30
भार्इंदर येथील अवघ्या चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करणाºया मोहम्मद युनूस उर्फ झिरो उर्फ झिरु हाजी मोहम्मद शहा (२४) या आरोपीला अजन्म कारावास तसेच विविध कलमांखाली १३ हजारांच्या दंडाची शिक्षा ठाण्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश हेमंत पटवर्धन यांनी सोमवारी सुनावली आहे. तसेच त्याच्या अन्य दोन साथीदारांना चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भार्इंदर येथील अवघ्या चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करणाºया मोहम्मद युनूस उर्फ झिरो उर्फ झिरु हाजी मोहम्मद शहा (२४) या आरोपीला अजन्म कारावास तसेच विविध कलमांखाली १३ हजारांच्या दंडाची तसेच त्याच्या अन्य दोन साथीदारांना चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठाण्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश हेमंत पटवर्धन यांनी सोमवारी सुनावली आहे. वैद्यकीय तसेच परिस्थितीजन्य पुरावा न्यायालयाने ग्राहय मानून ही शिक्षा ठोठावली.
भार्इंदर पूर्व येथील आझादनगर झोपडपट्टीजवळ असलेल्या ओमसाई इस्टेट आणि सोनम आशिष इमारतीच्या दरम्यान असलेल्या नाल्याजवळ आरोपींनी हे अघोरी कृत्य केले होते. ९ जानेवारी २०१७ रोजी रात्री ८ ते १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. यातील मोहम्मद युनूस याने त्याच भागात राहणारी ही अल्पवयीन मुलगी घरासमोर खेळत असतांना तिला चॉकलेटचे अमिष दाखवून तिचे अपहरण केले होते. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिच्या डोक्यात टणक वस्तूने प्रहार करुन तिची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर मोहम्मद शहा याच्यासह त्याचे साथीदार मोहम्मद रोजन उर्फ लंगडा राईनी (३१, रा. भार्इंदर) आणि जितेंद्र उर्फ जितू तिरथप्रसाद राव (३२) या तिघांनी मिळून तिला उचलून नाल्यातील गाळामध्ये तिचा मृतदेह बुजवून पुरावा नष्ट केला. याप्रकरणी ठाणे ग्रामीण नवघर पोलीस ठाण्यात खून, अपहरण, लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमाखाली १० जानेवारी २०१७ रोजी गुन्हा दाखल झाला होता. यातील तिन्ही आरोपींना १४ जानेवारी २०१७ रोजी नवघर पोलिसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे यांच्या पथकाने या प्रकरणाचा यशस्वीपणे तपास केला. यामध्ये १२ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीचे कपडे, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल, वैद्यकीय अहवाल आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीमध्ये भक्कम पुरावा सरकारी पक्षातर्फे पोलीस आणि सरकारी वकील उज्वला मोहळकर यांनी न्यायालयात सादर केला. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याचीही मागणी अॅड. मोहळकर यांनी लावून धरली. सर्व बाजू तपासल्यानंतर मुख्य आरोपी मोहम्मद युनूस याला अजन्म कारावास तसेच १३ हजारांचा दंड आणि मोहम्मद रोजन आणि जितेंद्र या त्याच्या दोन साथीदारांना चार वर्षांच्या सश्रम कारावासाची तसेच प्रत्येकी तीन हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने १४ डिसेंबर रोजी ठोठावली आहे.