लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार: पोलिसाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 11:29 PM2019-11-28T23:29:19+5:302019-11-28T23:36:57+5:30
फेसबुकवर मैत्रि झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील कपिल भोईर (२४) या पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध बुधवारी रात्री नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाºया ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील कपिल भोईर (२४) या पोलीस शिपायाविरुद्ध बुधवारी रात्री नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरूअसल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवी मुंबईतील नेरूळ येथे राहणारी ही पीडित तरुणी आणि २४ वर्षीय कपिल हे दोघेही कल्याण येथील एका खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये जात होते. तिथेच या दोघांची ओळख झाली. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांच्यात २०१७ पासून चांगली मैत्री झाली. याच मैत्रीतून त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. आॅगस्ट २०१८ ते मे २०१९ या १० महिन्यांच्या कालावधीमध्ये ते दोघेही बदलापूर, कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यातील उपवन आदी भागांत फिरले. दरम्यान, लग्न होणार असल्यामुळे या दोघांमध्ये शारीरिकसंबंधही आले. दरम्यानच्याच काळात, ठाणे शहर पोलीस दलात भरती झाल्यामुळे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पोलीस मुख्यालयात त्याला नियुक्ती मिळाली. मात्र, ती पोलीस भरती होऊ शकली नाही. तिने त्याच्याकडे लग्नासाठी आग्रह धरल्यानंतर त्याने लग्नाला नकार दिला. घरातील कुटुंबीय स्वीकारणार नाहीत. लग्नास मान्यता देणार नाहीत, अशा सबबी सांगून त्याने तिच्याशी लग्नास असमर्थता दर्शवली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या पीडित तरुणीने अखेर २७ नोव्हेंबर २०१९ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार करणे, शिवीगाळ करणे आणि धमकी दिल्याप्रकरणी आरोपी पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या इच्छेविरुद्ध त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली. सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.