लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:35 AM2021-05-03T04:35:02+5:302021-05-03T04:35:02+5:30
----------------------------------------------------- कामगारांचा सत्कार कल्याण : १ मे महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधत काँग्रेसच्या कल्याण- डोंबिवली शहर जिल्हा अनुसूचित ...
-----------------------------------------------------
कामगारांचा सत्कार
कल्याण : १ मे महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधत काँग्रेसच्या कल्याण- डोंबिवली शहर जिल्हा अनुसूचित जाती विभागाच्या वतीने कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या सफाई कामगारांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कामगारांना मिठाईचे वाटप करण्यात आले. अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आढावा, सेंच्युरी रेयॉन कंपनीचे कामगार नेते ज्ञानेश्वर पाटील, रिपाइंचे प्र. क्र. १६ चे वॉर्ड अध्यक्ष गणेश कांबळे, मनसेचे शाखाप्रमुख दिलीप गायकवाड, राष्ट्रवादीचे वॉर्ड अध्यक्ष नागसेन घनगाव, दत्ता फाले, सामाजिक कार्यकर्ते मनोज गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
-------------------------------------------------
गाड्यांची तोडफोड
कल्याण : पूर्वेतील काटेमानिवली परिसरात शनिवारी मध्यरात्री चार ते पाच गाड्यांची अनाेळखी व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. नुकसान झालेल्या वाहनांमध्ये जीप, दुचाकी, रिक्षा, कारचा समावेश आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून आरोपींंविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
-------------------------------------------------
पोर्टेबल ऑक्सिजनची मोफत सुविधा
डोंबिवली : कोरोनाचा वाढता धोका आणि ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा लक्षात घेता रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी पूर्वेतील राजाजी विभागातील मनसेचे विभाग अध्यक्ष रमेश यादव आणि मनसे शारीरिक सेना कल्याण- डोंबिवलीचे अध्यक्ष तेजस सेंद्रे यांच्या वतीने गरजूंना मोफत पोर्टेबल स्प्रे ऑक्सिजन सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. ऑक्सिजन बेड उपलब्ध होईपर्यंत या सिलिंडर स्प्रेचा गरजूंना उपयोग होणार असल्याचे यादव यांच्याकडून सांगण्यात आले. ७५० रुपये याची किंमत असून, स्वखर्चातून तो मोफत उपलब्ध करून दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
--------------------------------------------------