लैंगिक छळ करणाऱ्या भोंदूला कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 12:13 AM2018-10-26T00:13:03+5:302018-10-26T00:13:12+5:30
संततीसाठी पतीसमक्ष शरीरसंबंध ठेवायला लावून पीडित महिलेशी लैंगिक चाळे करणाºया योगेश पांडुरंग कुपेकर (४५) या भोंदूबाबाला न्यायालयाने १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा २३ आॅक्टोबर रोजी सुनावली.
ठाणे : संततीसाठी पतीसमक्ष शरीरसंबंध ठेवायला लावून पीडित महिलेशी लैंगिक चाळे करणाºया योगेश पांडुरंग कुपेकर (४५) या भोंदूबाबाला न्यायालयाने १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा २३ आॅक्टोबर रोजी सुनावली. हा प्रकार २०१६ मध्ये वर्तकनगर परिसरात घडला होता.
पीडित दाम्पत्य संततीप्राप्ती होत नसल्याने त्रस्त झाले होते. त्यासाठी त्यांनी भोंदूबाबाचा आसरा घेतला. कुपेकर याने आधी त्यांच्याकडून १० हजार रुपये उकळले. त्यानंतर त्या भोंदूबाबाने महिलेस पतीसमक्ष शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. पतीच्या आग्रहामुळे महिला यासाठी तयार झाली. हा प्रकार अडीच वर्षे सुरू होते. अखेरिस तिने पतीचा विरोध न जुमानता तक्रार दिली. जिल्हा सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सादर केलेले साक्षीपुरावे ग्राह्यमानून आरोपीस शिक्षा सुनावली. तत्कालीन पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत यांनी या प्रकरणाचा तपास केला.