लैंगिक छळ करणाऱ्या भोंदूबाबावर गुन्हा

By admin | Published: June 1, 2017 03:28 AM2017-06-01T03:28:15+5:302017-06-01T03:28:15+5:30

‘साईबाबाचा साक्षात्कार झाला असून तुमच्या वडिलांचा कॅन्सर सहज बरा करू शकतो. त्यासाठी पूजा करावी लागेल’ अशा वेगवेगळ्या

Sexual harassment violent crime | लैंगिक छळ करणाऱ्या भोंदूबाबावर गुन्हा

लैंगिक छळ करणाऱ्या भोंदूबाबावर गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ‘साईबाबाचा साक्षात्कार झाला असून तुमच्या वडिलांचा कॅन्सर सहज बरा करू शकतो. त्यासाठी पूजा करावी लागेल’ अशा वेगवेगळ्या बतावण्या करत एका महिलेचा लैंगिक छळ करून बदनानी करण्याची धमकी देणाऱ्या साईलाल जेडिया या भोंदूबाबाविरुद्ध चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मानपाडा येथील या महिलेची २०१५ मध्ये गुवाहाटीच्या साईलालशी फेसबुकद्वारे ओळख झाली. आपल्याला साईबाबांचा साक्षात्कार झाल्याचे त्याने बतावणी केली. त्याच्यावर विश्वास ठेवल्याने त्याने दिल्लीला बोलवले. तेव्हा वडिलांच्या कॅन्सरची समस्या तिने मांडली. आपल्यातील शक्तीने हा आजार बरा करू, असा दावा करून तीन लाख १० हजार रूपये पूजेच्या बहाण्याने घेतले. ‘तुमच्यावरही जादूटोणा केलेला असून अंगात वेगळा आत्मा आहे. तसेच तू पूर्वजन्मीची माझी पत्नी आहे’ असे सांगत तिच्यावर त्याने जून २०१५ मध्ये लैंगिक अत्याचार केला. ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत जून २०१५ ते ३० मे २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीत आसाम, दिल्ली आणि ठाण्यात तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. तिच्यावर जादूटोणा करण्याची आणि समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित महिलेने ३० मे रोजी चितळसर पोलीस ठाण्यात फसवणूक, बलात्कार, धमकी देणे, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंध कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Sexual harassment violent crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.